श्रद्धा स्वप्निल पोटघन गणपती सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक तर श्रद्धा व गौरी कडेकर गौराई सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक, मदन शिवाजी वाघमारे सेल्फी विथ बाप्पा या स्पर्धेत प्रथम

9 Star News
0
शिरूर प्रतिनीधी 
श्रद्धा स्वप्निल पोटघन गणपती सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक तर श्रद्धा व गौरी कडेकर गौराई सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक, मदन शिवाजी वाघमारे सेल्फी विथ बाप्पा या स्पर्धेत प्रथम या स्पर्धकांनी प्रकाशभाऊ धारीवाल गणराया करंडकाचे मानकरी ठरले आहेत.
        दानशूर उद्योजक प्रकाशभाऊ धारीवाल यांच्या हस्ते विजयी स्पर्धेकांचा सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले.
        येथील भुमीपुत्र प्रतिष्ठाणने आयोजित केलेल्या घरगुती गौरी गणपती स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आज संपन्न झाला 
उद्योजक प्रकाश धारीवाल यांच्या शुभहस्ते विजयी स्पर्धेकांचा सन्मान करण्यात आला 
यावेळी शिरुर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड सुभाष पवार,शिरुर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप,लोकजागृती चे संघटक रविंद्र धनक,शिवसेनेचे शहरप्रमुख संजय देशमुख,नगरसेविका मनिषा कालेवार,प्रकाश बाफना,संतोष शितोळे,किरण बनकर एजाज बागवान,सागर नरवडे आदी उपस्थित होते.
      घरगुती गणपती उत्सव व गौरी उत्सव या आपल्या धार्मिक सणामध्ये सजावट स्पर्धा घेऊन त्यातून महिला लहान मुले यांच्या कलागुणांना वाव मिळत असल्याचे प्रतिपादन दानशूर उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल यांनी व्यक्त केले.
      विजयी स्पर्धक पुढीप्रमाणे 
निकाल पुढील प्रमाणे
गौरी सजावट स्पर्धा
प्रथम क्रमांक-श्रद्धा व गौरी कडेकर
द्वितीय-वैशाली हारके 
तृतीय क्रमांक-सुनिता कडेकर,ज्योती कोळपकर
चतुर्थ क्रमांक- छाया उबाळे
गणपती सजावट
प्रथम क्रमांक श्रद्धा पोटघन
द्वितीय क्रमांक भक्ती शेलार
तृतीय क्रमांक-साई गुळादे,प्रतिक काशिकर
चतुर्थ क्रमांक-प्रतिक्षा भावटनकर 

सेल्फी विथ बाप्पा
प्रथम क्रमांक-मदन वाघमारे
द्वितीय क्रमांक-विहा रणदिवे
तृतीय क्रमांक-आदेश रेवणवार
चतुर्थ क्रमांक- दिपक घोडके

स्पर्धेचे आयोजक भुमीपुत्र प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सुशांत कुटे यांनी स्वागत केले तर रावसाहेब चक्रे यांनी सूत्रसंचालन केले योगेश जामदार यांनी आभार मानले
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!