१९८ शिरूर विधानसभा मतदारसंघात आज २८ऑक्टोबर रोजी ५ जणांनी ७ उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी संगीता राजापुरकर व सहाय्यक निवडणुक अधिकारी बाळासाहेब म्हस्के यांनी सांगितले.
उद्या २९ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून या दिवशी नक्की कोणाकोणाचे उमेदवारी अर्ज दाखल होती याकडे शिरूर हवेली तालुक्यातील लक्ष लागले आहे.
शिरूरचे विद्यमान आमदार अशोक पवार, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुजाता अशोक पवार यांनी प्रत्येकी दोन अर्ज, तर राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे बंडखोर शांताराम कटके, दत्तात्रय काळभोर ,चंद्रशेखर घाडगे या पाच जणांचे सात उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे.
उद्या दिनांक 29 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके व भाजपाचे नेते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद या प्रमुख नेत्यांचा उमेदवारी अर्ज येऊ शकतो.