शिरूर विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे उमेदवार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटके यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल...

9 Star News
0
शिरूर दिनांक प्रतिनिधी 
       शिरूर विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार व महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करीत ढोल ताशाच्या गजरात व गगनभेदी घोषणा देत आपला उमेदवारी अर्ज माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत भरला आहे.
           आज सकाळी वाघोली येथे वाघेश्वराचे दर्शन घेऊन महायुती व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांचें उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी शिरूर बाजार समिती आवारातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार घालून भव्य रॅली काढली होती. 

               या रॅलीला मोठा उत्साह मतदार व सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी दाखवला. शिरूर बाजार समिती आवारातून निघालेली रॅली शिरूर पाच कंदील चौक येथे जाहीर सभेमध्ये परिवर्तित झाली. याच वेळी मोजक्या कार्यकर्त्यास राष्ट्रवादी काँग्रेस  पक्षाची उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी शिरूर तहसील कार्यालय येथे आपला उमेदवार अर्ज दाखल केला.
          यावेळी घोडगंगाचे संचालक दादा पाटील फराटे, राहुल पाचर्णे, रविंद्र काळे,महेश ढमढरे , भगवान शेळके , रामभाऊ सासवडे , अरुण गिरे , नवनाथ काकडे , राजेंद्र जासूद, स्वप्निल गायकवाड, सुधीर फराटे उपस्थीत होते .
  त्यामुळे शिरूर विधानसभा मतदारसंघांमध्ये चुरशीची लढत होईल असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
      शिरूर विधानसभेमध्ये वाघोली चा वाहतूक कोंडीचा प्रश्न, यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न करणार असून, घोडगंगा सहकारी साखर कारखाना सुरू करून , औद्योगिक वसाहती स्थानिक तरुणांना नोकरीत प्राधान्य देण्यासाठी प्रयत्न करणारा त्यांनी सांगून माहिती सरकारने केलेली लाडकी बहीण शेतकऱ्यांची वीज बिल माफी या प्रमुख प्रमूख विषय घेऊन निवडणुकीला सामोरे जात असल्याची महायुतीचे उमेदवार माऊली कटके यांनी सांगितले.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!