कासारी फाट्यावर दोघा युवकांचे मोबाईल लांबवले
मुलींची शुटींग काढल्याचे म्हणत दुचाकीस्वारांकडून चोरी.
कासारी ता. शिरुर येथील कासारी फाटा येथे वाहनाची वाट पाहत थांबलेल्या दोघा युवकांचे दुचाकीहून आलेल्या दोघांनी तुम्ही मुलींची शुटींग काढली तुमचे मोबाईल दाखवा असे म्हणत मोबाईल दोघांचे हिसकावून पोबारा केल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात दुचाकीस्वार चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत गोलू उर्फ महेश सीताराम बर्डे (वय २१ वर्षे रा. गायकवाड वस्ती कोंढापुरी ता. शिरूर जि. पुणे )यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे कासारी फाटा ता. शिरुर येथील पुणे नगर महामार्गावर विशाल तडोले व गोलू बर्डे हे दोघे युवक वाहनाची वाट पाहत उभे असताना पल्सर दुचाकीहून दोघेजण आले, त्यांनी विशाल व गोलु यांना तुम्ही मुलींची शुटींग काढली आहे तुमचे मोबाईल दाखवा असे म्हणत दोघांनजवळील महागडे मोबाईल हिसकावून घेऊन अहमदनगर बाजूने भरधाव वेगाने निघून गेले, शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने हे करत आहे.
स्वतंत्र चौकट १ –
शिक्रापूर पोलिसांचा नवीन फंडा . . . . . . . .
शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दोघा युवकांचे मोबाईल दुचाकी स्वारांनी हिसकावून नेल्यानंतर शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये ताक्रात देण्यात युवक आले असता पोलिसांनी प्रथम मोबाईल गहाळ बाबत