रांजणगावात नोकरीच्या आमिषाने युवकांची फसवणूक
( प्रतिनिधी )
रांजणगाव गणपती ता. शिरुर येथील औद्योगिक वसाहतीमध्ये नोकरी लावतो असे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक करणाऱ्या तिघांवर रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत संकेत कृष्णा कांबळे (रा. रांजणगाव गणपती ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. सरूड ता. शाहुवाडी जि. कोल्हापूर) व पवन राजेश श्रीवास्तव (वय ३३ वर्षे रा. कारेगाव ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. अजयपूर ता. ग्वालीयार जि. ग्वालीयार मध्यप्रदेश) या दोघांनी रांजणगाव एमआयडीसि पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी शुभम जासूद, सागर शेलार व प्रवीण गजाले ( पूर्ण नाव पत्ता माहित नाही ) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
याबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे रांजणगाव गणपती ता. शिरुर येथे संकेत कांबळे तसेच प्रतिककुमार लालबाबू व पवन श्रीवास्तव हे नोकरी शोधत असताना जुना टोलनाका येथे असलेल्या एका ऑफिसमध्ये गेले असताना येथील प्रवीण गजाले व त्याच्या साथीदारांनी संकेत कडून तीन हजार तर पवन व प्रतिककुमार कडून तुम्हाला कंपनीमध्ये कायमची नोकरी लावतो असे म्हणून पाच हजार रुपये घेतले, त्यांनतर बरेच दिवस झाले तरी कोणाला कंपनीत कामाला लावले नाही आणि त्यांनतर तीघेजन पैसे परत मागत असताना त्यांना पैसे दिले नाही तसेच फोन घेण्यास टाळाटाळ करु लागल्याने आपली नोकरीच्या आमिषाने फसवणूक झाल्याचे सदर युवकांच्या लक्षात आल्याने
रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद देण्यात आली आहे याप्रकरणी तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमित चव्हाण व वैभव मोरे हे करत आहे.