शिरूर विधानसभेसाठी आमदार ॲड.अशोक पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला

9 Star News
0
शिरूर दिनांक प्रतिनिधी 
        शिरूर विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अशोक रावसाहेब पवार यांनी मोठी शक्ती प्रदर्शन करून खासदार संसदरत्न डॉ अमोल कोल्हे व खासदार निलेश लंके ,शिवसेना माजी जिल्हा प्रमूख संजय सातव , नेते जगन्नाथ शेवाळे यांच्या उपस्थितीत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
       शिरूर विधानसभेची निवडणूक निर्णय अधिकारी संगीता राजापूरकर व सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांच्याकडे उमेदवारी अर्ज दिला.
         आज सकाळी शिरूर बाजार समिती आवारातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार घालून मोठी रॅली काढून शक्ती प्रदर्शन करत शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यात पुष्पहार घालून शहरातील प्रमुख रस्त्यावरून मिरवणुकीने उमेदवारी अर्ज भरला. 
         यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, काँग्रेस आय, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची कार्यकर्ते व मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग होता.
          आज सकाळी रासाई देवी वडगाव रासाई, श्री रामलिंग शिरूर, व घरातील कुलदेवता नतमस्तक होऊन आमदार अशोक पवार आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शिरूर येथे आले. शिरूर येथे भव्य रॅलीने शक्तीप्रदर्शन करीत महिला, तरुण, पुरुष ,वृद्ध असे अनेक नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झाली होते.
           यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी या चिन्हाची प्रतिकृती या रॅलीमधे सहभागी होती. तर महाविकास आघाडीचे मित्र पक्षांचे उद्धव बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे व मशाली चे फोटो व झेंडे तसेच काँग्रेस चे झेंडे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाची झेंडे यावेळी महिला व रॅलीमध्ये सहभागी नागरिकांनी घेतले होते.
           यावेळी महाविकास आघाडीचा विजय असो शरद पवार जिंदाबाद, उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद, राहुल गांधी जिंदाबाद अशा गगनभेदी घोषणा देत मोठा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये संचारलेला दिसला. 
             यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष उमेदवार ॲड. अशोक पवार म्हणाले शिरूर हवेली मतदार संघातून शिरूर हवेलीच्या मतदाररांच्या व सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांच्या आशीर्वादाने मला उमेदवारी भेटली असून शिरूर तालुक्याचा वश हवेली तालुक्याचा विकास हे एकमेव ध्येय आम्ही कायम ठेवत आहे. समोरील महायुतीचे उमेदवार अद्याप जाहीर झाले नाही कारण त्यांच्याकडे उमेदवार नसून ते आता एक आयात उमेदवार घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. समोरचा उमेदवार कोणी असो मी केलेली विकास कामे सर्वसामान्य मतदार शेतकरी कामगार महिलावर्ग यांचा आशीर्वाद घेऊन या निवडणुकीमध्ये उतरलो आहे असे पवार यांनी सांगितले.
     
          
        
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!