शिरूरचे माजी आमदार शिरूर ते माजी आमदार स्व. बाबुराव पाचर्णे राजकारणातील एक असा अवलिया होता की ते जिकडे तिकडे तेथे असंख्य कार्यकर्ते असायची कार्यकर्त्यांची फौज निर्माण करणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती.
त्यांच्या पहिल्या निवडणुकीच्या प्रचार प्रमुख मी होतो राजकारणा पलीकडेचे आमची मैत्री होती आणि ती मैत्री आम्ही आयुष्यभर जोपासली अशा मित्राचा आशीर्वाद घेणे हे आपलं कर्तव्य आहे असे म्हणत आमदार अशोक पवार यांनी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिरूर विधानसभेचे उमेदवार अशोक पवार यांनी उमेदवारी अर्ज भरणे अगोदर शिरूर चे माजी आमदार स्व. बाबूराव पाचर्णे यांच्या शक्ती स्थळावर जाऊन दर्शन घेतले असल्याने आमदार अशोक पवार यांच्या चांगुल पणाचे दर्शन झाले आहे.
मला शिरूर विधानसभेची निवडणूक लागली परंतु या निवडणुकीत 30 वर्षानंतर माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचा निधन झाले त्यामुळे या शिरूर शहर व पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये निवडणुकीबाबत उदासीनता दिसून येत आहे. त्यात शिरूरचे आमदार अशोक पवार हे स्वर्गीय आमदार बाबूराव पाचर्णे यांचे जवळचे मित्र परंतु राजकारणाच्या वाटा वेगळ्या झाल्या ते पंधरा वर्षे एकमेकांचे कट्टर विरोधक व एकामेकांविरोधात तीन विधानसभा निवडणूक लढल्या.
परंतु आमदार पाचर्णे आजारी असताना त्यांची दोन ते तीन वेळा तब्येतीची चौकशी करून आम्ही दोघे जवळचे मित्र होतो केवळ राजकारणामुळे आम्ही वेगवेगळ्या वाटा निवडल्या आहेत असे म्हणत अनेक गोष्टींची आठवण काढून ते गहिवरले होते.
परंतु या निवडणुकीत माजी आमदार स्वर्गीय बाबुराव पाचर्णे यांचा निधन झालेले असल्याने शिरूर तालुक्यातील अनेक नेते त्यांच्या शक्ती स्थळावर जाऊन त्यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेत आहे यातच आमदार अशोक पवार यांनीही पाचर्णे यांच्या शक्ती स्थळावर येऊन त्यांचे दर्शन घेऊन एका मित्राचा आशीर्वाद घेतला आमदार बाबुराव पाचर्णे आणि माजी मैत्री होती ही संपूर्ण तालुक्याला माहिती आहे. राजकारणात वाटा वेगळ्या झाल्या तरी आम्ही दोघांनी एकमेकांवर खालच्या पातळीवर कधी टीका केली नसून, आम्ही राजकारणा पलीकडची आमची मैत्री कायम जोपासली असल्याचे आमदार अशोक पवार यांनी सांगितले.
