शिरूर विधानसभा मतदार संघासाठी भारतीय जनता पार्टीचे बंडखोर उमेदवार प्रदीप कंद यांनी आज आपला अपक्ष उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी संगीता राजापूरकर व सहाय्यक निवडणूक अधिकारी बाळासाहेब म्हस्के यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
शिरूर विधानसभेमध्ये बंडखोर उमेदवार उभा राहिला असल्याने आज तरी महायुतीत बिघाडी झाली आहे.
भाजपा शिरूर तालुका अध्यक्ष प्रदीप सोनवणे, संदिप भोंडवे उपास्थित होते.
जरी प्रदीप कंद व शांताराम कटके यांचा बंडखोर म्हणून उमेदवारी अर्ज दाखल झाला असला तरी पुढील काळात राजकीय गणित बदलून ते माघार घेतात का? याकडे शिरूर हवेली तालुक्याचे लक्ष लागले आहे.
कंद हे भारतीय जनता पार्टी कडून उमेदवारीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून इच्छुक होती परंतु ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या पक्षाला गेल्याने व गेले तीन विधानसभा निवडणूक दरम्यान प्रदीप कंद यांना उमेदवारीने दिलेली हुलकावणी यामुळे त्यांनी हा बंडखोरी अर्ज भरला असल्याची प्रत्यक्ष दर्शनी दिसून येत आहे.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे शिरूर तालुका अध्यक्ष प्रदीप सोनवणे, हवेली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे, यशवंत साखर कारखान्याची चेअरमन सुभाष जगताप, राहुल गवारी, संतोष मोरे , दौलत खेडकर, किसान संघाची प्रदेश सचिव जयेश शिंदे, रविंद्र कंद, रोहित खैरे, व मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रदिप कंद यांचा उमेदवारी अर्ज भरताना भारतीय जनता पार्टीचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित असल्याचे दिसून आले. त्यामुळे भविष्यकाळात माघार झाली तरी हे कार्यकर्ते महायुतीचे काम करतील का?
उमेदवारी आज तरी बंडखोरी असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या चार नोव्हेंबर पर्यंत भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनंती केली तर उमेदवारी मागे होऊ शकते असे राजकीय जाणकारांचे मत आहे.