मांडवगण फराटा येथील भिमा नदीपात्रात सापडलेल्या अनोळखी मृतदेहाचा खून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून अतिशाय शिताफीने केलेल्या तपासात शिरूर पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली असून त्यांनी खून केल्याची कबूली दिली आहे.
यामुळे कानून के हात लंबे होते है याचा प्रत्यय आला आहे.
पोलिसांच्या या कामगिरीचा मांडवगण फराटा व शिरूर तालुक्यातून कौतुक होत आहे.
सरजु (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) असे खून झालेल्या चे नाव आहे.
नवनाथ तुकाराम कोंडे (वय ४२ वर्षे,रा.मांडवगण फराटा,ता.शिरूर जि.पुणे) याने फिर्याद दिली आहे.
शेरसिंग ओमबीर कुमार ,करण अनिल ठाकूर (सध्या रा. मांडवगण फराटा,ता.शिरूर, जि.पुणे शीतलगढी, ता.जि.शामली, उतरप्रदेश ) यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवनाथ तुकाराम कोंडे (वय ४२ वर्षे,रा.मांडवगण फराटा,ता.शिरूर जि.पुणे) याने फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे १ ऑगस्ट सकाळीं साडेदहा वाजता मांडवगण फराटा येथे भिमा नदी काठी एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत नदीत तरंगत असल्याची माहीती पोलीस उपनिरिक्षक शुभम चव्हाण यांना मिळाली होती. प्रेत नदीपात्रातून बाहेर काढून पंचनामा सल शवच्छेदन केले त्यात त्याचा मृत्यू पाण्यात बुडून झाला असल्याचं प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले.
मयताचा तपास सुरू असताना पोलीस उपनिरिक्षक शुभम चव्हाण, यांना गोपणीय बातमीदारामार्फत माहीती मिळाली ३ ते ४ दिवसांपुर्वी दोन अनोळखी इराम यांनी मांडवगण फराटा भिमा नदीचे पात्रात गोणीमध्ये गुडाळून काहीतरी नदीपत्रात फेकुन ते दोन्ही इसम मोटारसायकलवरून तेथुन निघुन गेले होते.
मिळालेल्या बातमीच्या आधारे पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवुन मांडवगण फराटा हद्दीतील सुमोर १०० पेक्षा अधीक सी. सी.टि.व्ही. फुटेज तपासुन मोटारसायकल वरील दोन अनोळखी व्यक्तीचा शोध घेतला.नवनाथ तुकाराम कोंडे वय ४२ वर्ष यांचेकडे तपास करताना माहीती मिळाली की दोन्हीं आरोपी त्यांचे गुऱ्हाळावर काम करताय त्यांचे मालकीचे जमीन गट नं 16 मधील उसाचे गुऱ्हाळामध्ये गुळ बनवण्याचे काम सुरू असताना गु-हाळावरील कामगार सरजू (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) हा दारू पिवुन आल्याने शेरसिंग ओमबीर कुमार व करण अनिल ठाकूर यांचेशी सरजूचे काम करण्याचे कारणावरून किरकोळ वाद होवुन, त्यांच्यात झालेल्या झटापटीमध्ये सरजु हा तोल जावुन उसाच्या गरम रसाच्या कढईत पडल्याने शेरसिंग कुमार व करण ठाकुर यांनी सरजूला कढईच्या बाहेर काढले. त्यावेळी सरजूहा भाजल्यामुळे जखमी झालेला असताना व जीवंत असताना शेरसिंग कुमार व करण ठाकुर यांनी त्यास गाडीवर बसवुन उपचारासाठी दवाखान्यात घेवुन जातो असे सांगून त्याला दवाखान्यात नेण्याऐवजी भीमा नदीचे पात्रात फेकुन देवून त्याचा खुन करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. या खुनाची कबुली दोन्ही आरोपींनी दिली आहे.
याबाबत फिर्याद दाखल झाल्याने शिरूर पोलीस स्टेशन येथे दोघानांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हि कार्यवाही pपुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे विभागाचे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस स्टेशन मांडवगण दुरक्षेत्र प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, सहा. पोलीस उपनिरीक्षक रमेश कदम, पोलीस हवालदार अमोल गवळी, संपत खबाले, अशोक शिंदे, पोलीस अंमलदार किशोर वाघ, तानाजी बाबर, भाउसाहेब टेंगले यांचे पोलीस पथकाने केली आहे.
पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करीत .