वाढदिवसाहून परतताना महिलेवर काळाचा घाला
शिक्रापुरात बसच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू
( प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर येथील एका मैत्रिणीच्या मुलीच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून परतणाऱ्या महिलेच्या दुचाकीला बसची धडक बसून झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू झाला तर एकजण किरकोळ जखमी झाला आहे.
सारिका पांडुरंग खराडे या महिलेचा जागीच मृत्यू झाला असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गणेश श्रीराम म्हस्के या बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्रापूर ता. शिरुर येथे सारिका खराडे हि महिला तिच्या मैत्रिणीच्या मुलीच्या वाढदिवसासाठी आलेली असताना वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून सारिका खराडे व विकी जगताप हे दोघे त्यांच्या ताब्यातील एम एच १२ एच जि २४१४ या दुचाकीहून शिक्रापूर बाजूने कोरेगाव भीमाकडे जात असताना स्वागत हॉटेल समोर पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या एम एच ०३ सि पी २५२६ या बसची सारिका यांना जोरदार धडक बसून अपघात होऊन सदर अपघातात सारिका गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला, सदर अपघातात सारिका पांडुरंग खराडे वय ३० वर्षे रा. कोरेगाव भीमा ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. खेड ता. धाराशिव जि. धाराशिव यांचा मृत्यू झाला असून विकी जगताप रा. कोरेगाव भीमा ता. शिरुर जि. पुणे हा किरकोळ जखमी झाला, याबाबत पांडुरंग नारायण खराडे वय ३७ वर्षे रा. कोरेगाव भीमा ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. खेड ता. धाराशिव जि. धाराशिव यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी गणेश श्रीराम म्हस्के रा. ज्ञानेश्वरनगर तळेगाव दाभाडे ता. मावळ जि. पुणे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार महेंद्र पाटील हे करत आहे.
