शिरूर ( प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर सह तालुक्यातील अनेक शिक्षकांनी स्वराज्य ट्रेकर्स समूहाच्या माध्यमातून हरिश्चंद्रगड गड सर करण्याचा निर्णय घेत दाट धुके व पावसाचा सामना करत तब्बल चाळीस शिक्षिका व शिक्षकांकडून हरिश्चंद्रगड सर केला आहे.
शिक्रापूर ता. शिरुर सह तालुक्यातील शिक्षकांनी एकत्र येत स्वराज्य ट्रेकर्स समूहाच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला एक गड सर करण्याची मोहीम सुरु केली, नुकतेच सदर शिक्षकांनी विशेष असा हरिश्चंद्रगड सर करण्याचा निर्णय घेत दाट धुके, पावसाची रिमझिम व ऊन सावल्यांच्या खेळामध्ये चाळीस शिक्षकांनी हरिश्चंद्रगड सर केला. सर्वांनी श्रीकांत निचित व कैलास पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मोहीम सुरु करत संतोष थोपटे, आशा सकट, संगीता शेवाळे, संतोष शेवाळे, संतोष जाधव, रमेश झिंजुर्के, दिलीप सरोदे, आबासाहेब जाधव, सागर गायकवाड, माया लंघे, उज्वला टेमगिरे, दिपक पाटील, सविता जटाड, मनीषा शेळके, सुनील शेळके, विनायक उकले, रमेश झिंजुर्के यांसह आदींनी सहभाग घेत रात्रभर प्रवास करून हरिश्चंद्रगड गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या पाचनई गावातून गड सर करण्यास सुरुवात केली, दोन अडीच तासात हरिश्चंद्रगड गड सर केल्यानंतर तेथील असणारे प्रसिद्ध शिवमंदिर, लेण्या, धबधबे, कोकणकडा पाहून सर्व ट्रेकर्स मंत्रमुग्ध झाले. दरम्यान बापूसाहेब लांडगे यांनी गडाचे महत्व विशद केले, तर यावेळी विशेष असा हरिश्चंद्रगड गड सर केल्याने सर्वांना वेगळा आनंद मिळाला आहे.
फोटो खालील ओळ – शिक्रापूर ता. शिरुर सह तालुक्यातील हरिश्चंद्रगड गड सर करणारे शिक्षक.