शिक्रापूर औद्योगिक परीसरात दहशत निर्माण करून गुंडगिरी करणाऱ्या तरुणाला एम पी डी ए कायद्यांतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात करण्यात आले आहे. त्याची पुणे येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
सागर उर्फ सचिन राजेंद्र कुसेकर (वय ३२, रा. पिंपळे जगताप, ता. शिरुर, जि.पुणे) याला एम पी डी ए कायद्यांतर्गत स्थानबध्द करण्यात आले आहे.
शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोठया प्रमाणात औद्योगिकीकरण झालेले आहे. याच औद्योगिकरण क्षेत्रामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती डोके वर काढुन काही लोक गैरमार्गाने आर्थिक प्राप्ती करण्यासाठी दहशत निर्माण करुन गंभीर स्वरुपाचे गुन्हे करीत असतात. अशा प्रकारच्या गुन्हयांना वेळीच आळा घालुन त्यांच्यावर प्रचलित कायद्यान्वये कारवाई करण्याचे आदेश पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांनी दिलेले आहेत.
त्यानुसार शिक्रापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्यीतील गुन्हेगारांचा अभिलेख तपासुन नियमीत गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची यादी तयार केली. त्यामध्ये सागर उर्फ सचिन कुसेकर याच्यावर दुखापत, गंभीर दुखापत, खंडणी मागणे, खंडणीसाठी अपहरण करणे अशा प्रकारचे एकुण ४ गुन्हे दाखल असल्याचे दिपरतन गायकवाड यांच्या निदर्शनास आले.
वरील गुन्हयातील आरोपी सागर उर्फ सचिन कुसेकर याच्या विरुध्द शिक्रापुर पोलीस स्टेशन येथुन एम पी डी ए कायद्यातंर्गत प्रस्ताव तयार करुन सदर प्रस्ताव पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्या मार्फत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पुणे यांच्याकडे सादर करण्यात आला होता. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पुणे यांनी सदर प्रस्तावामधील व्यक्ती सागर उर्फ सचिन कुसेकर यास ‘धोकादायक व्यक्ती’ या सदराखाली स्थानबध्द करण्याचे आदेश पारीत केले.
शिक्रापुर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सागर उर्फ सचिन कुसेकर याला ताब्यात घेवुन सर्व कायदेशीर बाबींची पुर्तता करत त्यास पुणे येथील येरवडा मध्यवर्ती कारागृह येरवडा पुणे येथे रवानगी करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, पुण्याचे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिक्रापुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक महेश डोंगरे यांच्यासह सहायक फौजदार जितेंद्र पानसरे, पोलिस हवालदार महेश बनकर, रामदास बाबर, श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, विकास पाटील, रोहीदास पारखे, अतुल पखाले, शिवाजी चितारे, जयराज देवकर यांच्या पथकाने केली आहे.