शिरूर रामलिंग रस्त्यावर सेंट्रींग चे काम करत असताना करंट लागून 46 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे आकस्म्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
राधेश्याम महेशप्रसाद चौरासिया (वय 46 वर्षे, रा ओमरूद्रा कॉलनी रामलिंग रोड शिरूर ता शिरूर जि पुणे) हे मयत झाले आहेत.
याबाबत सुधीर राधेश्याम चौरासिया (वय 24 वर्षे धंदा-शिक्षण रा. ओमरूद्रा कॉलनी, रामलिंग रोड, शिरूर ता शिरूर) याने खबर दिली आहे.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे तरी दिनांक ३०सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता मयत राधेश्याम सेंट्रींगचे कामावर गेले होते. दुपारी सव्वा चार वाजनेचे दरम्यान खबर देणारे शिरूर येथे जेनेरिक मेडीकल येथे असताना त्यांचे ओळखीचे अनिल घावटे यांचा मला फोन आला व त्यांनी मला सांगितले की तुझे वडील राधेश्याम महेशप्रसाद चौरासिया वय 46 वर्षे यांना बंधकामाचे साईटवर असताना इलेक्ट्रिक लाईटचा शॉक लागला आहे असे सांगितले तेव्हा लगेच रामलिंग येथे वडीलांचे काम चालु असलेल्या ठिकाणी गेलो असता माझे वडील तेथे बेशुध्द अवस्थेत पडलेले होते त्यांना आम्ही तेथे जमलेल्या लोकांचे मदतीने उपचारकामी ग्रामीण रुमालय शिरूर येथे आणले असता तेथिल डॉक्टरांनी वडील, राधेश्याम चौरसिया हे उपाचारपूर्विच मयत झाले असल्याचे सांगितले.
याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे आकस्मित नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गिरी करीत आहे.