भाजपा जिल्हा उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय पाचंगे यांचा शिरूर विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज...

9 Star News
0
शिरूर दिनांक प्रतिनिधी 
     शिरूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय पाचंगे यांनी शिरूर विधानसभेसाठी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. यावेळी भारतीय जनता पार्टी व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
     शिरूर विधानसभेसाठी संजय पाचंगे हे इच्छुक होते परंतु त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता दुसरी झाल्याने तसेच महायुतीमध्ये शिरूर विधानसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीला  नसून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला जाणार असल्याची चर्चा आहे.
      त्यात भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते नाराज झाले असून या नाराजीचा फायदा घेत. भारतीय जनता पार्टीचे उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय पाचंगे यांनी आपला उमेदवारी अर्ज शिरूर विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी संगीता राजापूरकर यांच्याकडे दाखल केला आहे. 
       पाचंगे यांचा उमेदवारी अर्ज आणि भारतीय जनता पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
        यावेळी बोलताना भारतीय जनता पक्षाचे उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते संजय पाचंगे म्हणाले शिरूर विधानसभा मतदारसंघासाठी मी इच्छुक होतो आणि आजही आहे जोपर्यंत उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत मी पक्षा बरोबरच आहे. परंतु शिरूर विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पाठशाला जाती अशी चर्चा असून, मी त्या अनुषंगाने शिरूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जर ही जागा भारतीय जनता पार्टीला सुटली नाही तर माझा अपक्ष उमेदवारी अर्ज कायम राहील व भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सर्व जीवाच्या कार्यकर्त्यांना माझ्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संजय शिवाजी पाचंगे ,रामचंद्र पंढरीनाथ निंबाळकर माजी अध्यक्ष भारतीय जनता पार्टी ज्ञानेश्वर भैरट, गोरक्ष काळे माजी सरचिटणीस,
तालुका सरचिटणीस पंढरीनाथ गायकवाड, माजी सरचिटणीस शिरूर तालुका अनिल नवले, अध्यक्ष गणपतराव पराठे माजी जिल्हाध्यक्ष आध्यात्मिक आघाडी विजयराव नरके शिरूर शहर केशव लोखंडे माजी अध्यक्ष शिरूर शहर विठ्ठल वाघ बाबुराव दौंडकर स्मारक समिती सदस्य लक्ष्मण भगत नवनाथ जाधव सरचिटणीस शिरूर शहर ठकसेन ढवळे सामाजिक कार्यकर्ता
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!