दिवाळी सणाला गावाला जात आहे .सुट्टीसाठी गावाला जात आहे. खालील गोष्टींची पालन केल्यास आपले घर राहणार सुरक्षित शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी याबाबत नागरिकांना सूचना दिल्या आहे या सूचनेचे पालन केल्यास आपल्या घरी सोसायटीत चोरी होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
नागरीकांसाठी महत्वाच्या सुचना :-
१) जर तुम्ही बाहेरगावी जाणार असेल तर आपल्या शेजारी राहणा-यांना सांगून जा.
२) बाहेरगावी घर बंद करुन जात असेल तर घरात रोख रक्कम व दागिने ठेवू नये.
३) घराच्या दाराला कडी कोंडा ऐवजी सेन्ट्रींग लॉक चा वापर करावा.
४) घराच्या दरवाज्याला १ होल आवश्यक आहे. जेणे करुन अनोळखी इसम असल्यास माहिती मिळू शकेल.
५) घराचे मुख्य दरवानास सेफ्टी लोखंडी दरवाजा लावावा.
६) कोणताही अनोळखी इसम, फेरीवाले, सोने उनळुन देतो, भविष्य सांगतो असा लोकांना घरात प्रवेश देवू नये व शक्य झाल्यास अनोळखी इसमांचा मोबाईलमध्ये फोटो काढावा.
७) आपण राहत असलेल्या अपार्टमेंटमध्ये, गल्लीत सामुहिक प्रयत्नातून सीसीटिव्ही लावण्याकरीता प्रयत्न करावा.
८) दुध आणुन देणारा, पेपर टाकणारा, भाजी विक्रेता, मुलांना शाळेत सोडणारे, रिक्षा, बसवाले, इलेक्ट्रिशियन,
प्लंबर, घरात काम करणारी स्त्री/पुरुष यांचा मोबाईल क्रमांक, पुर्ण पत्ता, फोटो ठेवावे. घर फोडी करणारे आरोपी
यांचे मार्फत लक्ष ठेवतात.
) आपण बाहेरगावी जात असाल तर घरातील लाईट चालु ठेवावी, जेणे करुण घरात कोणी तरी आहे असे जाणवेल.
९ १०) फोनवरुन किंवा मॅसेज वरुन तुमच्या बँक खात्याची माहिती विचारल्यास सांगु नये, OTP शेअर करु नये.
११) रात्रीचे वेळी घराबाहेरची लाईट चालु ठेवावी. जेणे करुन पेट्रोलिंग करणा-या पोलीसांना लक्ष ठेवता येईल.
१२) भाडेकरु ठेवायचे असल्यास त्यांची संपूर्ण माहिती ठेवावी व पोलीस स्टेशनला माहिती दयावी.
१३) बाहेरगावी जातेवेळी Whatsapp/Facebook व इतर सोशल मिडीयावर आपण कोठे आहे याबाबत माहिती टाकु नये.
१४) आपल्या घराचे खिडक्या, दरवाजे यांना लोखंडी ग्रिल लावुन मजबुत करुन घ्यावेत.
१५) संशयीत व्यक्ती, सेल्समॅन, फिरते विक्रेते, विनाकारण भटकणारे, ये-जा करणारे संशयीताची माहिती तात्काळ पोलीसांनी दयावी व त्यास आवर्जुन हटकावे.
दिवाळीचे सण व सुट्टीचे दिवस असल्याने अनेक नागरिक आपापल्या गावी सुट्टीसाठी व सणासाठी जात असून नागरिकांनी आपण गावाला जात असताना आपल्या घराची सुरक्षितता घेणे पोलिसांबरोबर आपलेही कर्तव्य आहे .त्यासाठी प्रत्येकाने नियमांचे पालन केल्यास आपले घर आपली सोसायटी सुरक्षित राहणार आहे व चोरी होण्यापासून वाचणार असल्याचे पोलीस निरीक्षक केंजळे यांनी सांगितले.