शिक्रापूरात स्टेट बँक ऑफ इंडिया आगीच्या भस्मस्थानी

9 Star News
0
शिक्रापूरात स्टेट बँक ऑफ इंडिया आगीच्या भस्मस्थानी
शिरूर 
( प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर येथील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेला बुधवारी पहाटेच्या सुमारास अचानकपणे लागलेल्या आगीमध्ये बँक पूर्णपणे जाळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले असून दोन अग्निशमक बंबाच्या सहाय्याने आग विजावण्यात यश आले असून दुर्घटना टळली आहे.
                            शिक्रापूर ता. शिरुर येथील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेसमोरुन महिला पोलीस हवालदार किरण निकम या पहाटेच्या सुमारास मोर्निंग वॉक साठी जात असताना त्यांना बँकेच्या आतमधून धुराचे लोळ येत असल्याचे दिसल्याने त्यांनी तातडीने पोलीस स्टेशनसह अग्निशमक दलाला माहिती दिली, दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलीस हवालदार रोहिदास पारखे, किरण निकम, ललित चक्रनारायण, बँकेचे व्यवस्थापक अमोल नफाडे, ग्रामपंचायत सदस्य पूजा भुजबळ, त्रिनयन कळमकर, दिपक भुजबळ, नाना गिलबिले, ओंकार हिरवे, सोमनाथ भुजबळ यांसह आदींनी स्थानी नागरिकांच्या मदतीने आग विजावण्याचा प्रयत्न केला, काही वेळाने पुणे महानगर विकास प्राधिकरण व रांजणगाव औद्योगिक वसाहत येथील दोन अग्निशमक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले, यावेळी रांजणगाव औद्योगिक वसाहतचे उपअग्निशमन अधिकारी महेंद्र माळी, अशोक हातवटे, अमोल गायकवाड, सचिन शेंडगे, पुणे महानगर विकास प्राधिकरणचे अल्ताब पटेल, लक्ष्मण मिसाळ, प्रशांत अडसूळ, महेश पाटील, संकेत कुंभार, कृष्णा नांगरे यांसह आदींनी अथक परिश्रम घेत आग आटोक्यात आणली, मात्र आगीमध्ये बँकेचे सर्व साहित्य, कागदपत्रे, कॉम्प्युटर, फर्निचर जाळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले मात्र बँकेचे मुख्य लॉकर सुरक्षित राहिले असल्याचे दिसून आले, मात्र यावेळी लागलेली आग नेमकी कशाने लागली याबाबत काही समजू शकले नाही, तर ऐन वर्दळीच्या ठिकाणी व मनुष्यवस्ती मध्ये असलेल्या बँकेला लागलेल्या आगीने परिसरात खळबळ उडाली आहे.
फोयो खालील ओळ – शिक्रापूर ता. शिरुर येथे बँकेला लागलेली भीषण आग व आगीमध्ये खाक झालेले बँकेचे साहित्य.\

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!