खुनाच्या गुन्हयातील आरोपीस रांजणगाव MIDC पोलीसांनी ठोकल्या बेड्या"
कारेगाव ता शिरूर येथे २९ वर्षीय तरुणाचा खून करून फरार झालेला आरोपीला रांजणगाव पोलीस स्टेशन पोलीस पथकाने मोठ्या शिताफीने अटक केली असल्याची माहिती रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली आहे.
राजेशकुमार चनिराख चौहाण (वय २७ वर्षे. रा.इसुआ, ता. सरमेरा, जि. नालंदा, राज्य बिहार ) असे कुणाच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
रामप्रसाद श्रीरघुवीर सिंग (वय २९ वर्षे, मुळ रा. पौडी, कुंवरपुर, ता.भरतपुर, जि. कोरीया, छत्तीसगढ )
हा मयत अवस्थेत मिळाला होता.
मयताच्या भाऊ.रविंद्र श्रीरघुवीर सिंग (वर्षे, मुळ रा. पौडी, कुंवरपुर, ता.भरतपुर, जि. कोरीया, छत्तीसगढ) यांनी फिर्याद दिली होती.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे २७ सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता कारेगाव ता . शिरूर येथील अजित नवले यांचे भाड्याने दिलेल्या खोल्यांजवळ रामप्रसाद श्रीरघुवीर सिंग हा मयत अवस्थेत मिळुन आला होता. त्याबाबत त्याचा भाऊ रविंद्र सिंग यांने खबर दिली होती. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. परंतु मृत्यूमुखी पडलेल्या च्या डोक्यात गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाल्यचा अहवाल शवविच्छेदन करणारे वैद्यकीय अधिकारी यांनी दिला होता. यावरून रांजणगाव पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर रांजणगाव पोलिसांनी तपास चक्रे फिरवली त्यात घटनास्थळावर आजूबाजूला असणारे सीसीटीव्ही फुटेज तपासली यामध्ये मृत्यू पडलेला व्यक्तीस त्या ठिकाणी भाड्याने राहणारा राजेशकुमार चौहान याने लाकडी दांडक्याने मारहाण केली असलेचे दिसून आले. हा गुन्हा केल्यानंतर राजेश कुमार हा बिहार कडे पळून जाईल असे वाटत असल्याने तसेच खुनतील आरोपी राजेश कुमार हा मोबाईल वापरत नव्हता
तेथे कोणीही नातेवाईक या परिसरातले आसल्याची ची माहिती नव्हती त्यामुळे पोलिसांपुढे आरोपीला पकडणे मोठे आव्हान होते.रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी तीन तपास पथके तयार करून एक पुणे रेल्वे स्टेशन दुसरे अहमदनगर रेल्वे स्टेशन व तिसरे तपास पथक रांजणगाव परिसरातील सीसीटीव्ही चेक करण्यासाठी तैनात केले होते.तर चौथे पथक पुणे स्थानिक गुन्हे शाखेचे असे चार पथके तयार केली होती.
रांजणगाव पोलीस पथकाने औद्योगिक वसाहती परिसरातील 25 ते 30 सीसीटीव्ही कॅमेरे चेक केल्यानंतर रात्री दहा वाजता सदर पुण्यातील आरोपी राजेश कुमार याला मोठ्या सीताफिने अटक केली आहे.
हि कार्यवाही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक चव्हाण, सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस हवालदार विलास आंबेकर, वैज्जनाथ नागरगोजे, संतोष औटी, पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, पोलीस हवालदार माऊली शिंदे, तेजस रासकर, गणेश आगलावे, पोलीस कॉन्स्टेबल अजित पवार, स्थानिक गुन्हे शाखेकेचे सहाय्यक फौजदार तुषार पंधारे, पोलीस हवालदार जनार्धन शेळके, राजु मोमीन, संजय जाधव, पोलीस कॉन्स्टेबल सागर धुमाळ यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक चव्हाण हे करीत आहे.