शिरूर
( प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरूर येथे एका तीन वर्षीय चिमूरडीवर अत्याचार झाल्याची घटना घडली असताना येथील मुस्लीम समाजाने सदर घटनेचा निषेध व्यक्त करत आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी करत पोलिसांना निवेदन दिले आहे.
शिक्रापूर ता. शिरुर येथे २५ सप्टेबर रोजी एका तीन वर्षीय चिमूरडीवर अल्पवयीन युवकाकडून अत्याचार झाल्याची घटना घडली, सदर घटनेचा गावातील मुस्लीम समाजाने निषेध व्यक्त करत आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी करत पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना निवेदन दिले असून पोलिसांनी देखील सदर आरोपीला दोन तासात जेरबंद केल्याबाबत पोलिसांचे आभार मानले, यावेळी सरपंच रमेश गडदे, जामा मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष हाजी शिराजभाई शेख, फिरोजभाई तांबोळी, रिजवान बागवान, अमीन शेख, मुन्नाभाई तांबोळी, आयुब तांबोळी, तौफिक इनामदार, सलीम तांबोळी, जमीर तांबोळी, इमरान इनामदार, अलीभाई तांबोळी, सादिक तांबोळी, बंटी तांबोळी, इलियास शेख यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो खालील ओळ - शिक्रापूर ता. शिरुर येथील घटनेचा निषेध व्यक्त करत मुस्लीम समाजाचे प्रतिनिधी व पदाधिकारी.