( प्रतिनिधी ) सणसवाडी ता. येथील एका कंपनीच्या आवारातून दोघा चोरट्यांनी तब्बल आठ लाखांच्या लोखंडी प्लेटा चोरून नेल्याची घटना घडली असताना पोलिसांनी सुरक्षारक्षकासह दोघा चोरट्यांना आणि भंगार दुकानदाराला अटक केली आहे.
दरम्यान पोलिसांनी सुरक्षारक्षक सुरेश माधव लाटे (वय ३३ वर्षे रा. वाडेगाव फाटा कोरेगाव भीमा ता. शिरुर जि. पुणे), मोजम निजाम बेग (वय ३८ वर्षे रा. कोरेगाव भीमा ता. शिरुर जि. पुणे) व भंगार दुकानदार उबेद बरकत खान (वय २४ वर्षे रा. ताडीवाला रोड स्टेशन पुण या तिघांना अटक केली आहे.
सणसवाडी ता. शिरुर ट्रेनटर इंडिया प्रायवेट लिमिटेड कंपनीमध्ये मोकळ्या जागेमध्ये कंपनीसाठी लागणाऱ्या शंभरहून अधिक लोखंडी प्लेटा ठेवलेल्या होत्या, कंपनीतील कामगार त्या प्लेटा आणण्यासाठी गेले असता त्यांना प्लेटा दिसून न आल्याने त्यांनी व्यवस्थापकांना माहिती दिल्याने त्यांनी सर्व सीसीटीव्ही तपासले असता त्यांना तोंडाला रुमाल बांधलेल्या दोघांनी तब्बल आठ लाख रुपये किमतीच्या लोखंडी प्लेटा लांबवल्याचे दिसून आले, याबाबत प्रसाद प्रकाशराव चवणे वय ३६ वर्षे रा. आंबेगाव कात्रज पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी दोघा अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करत पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दामोदर होळकर यांनी तपास सुरु केला असताना पोलिसांनी संशयित सुरक्षारक्षक सुरेश लाटे याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार मोजम बेग याच्या मदतीने सदर चोरी करुन भंगार दुकानदार उबेद खान याला विक्री केल्याचे सांगितले,
सुरेश माधव लाटे या सुरक्षारक्षकासह उबेद बरकत खान व मोजम निजाम बेग पोलिसांनी अटक केली
असून पुढील तपास पोलीस हवलदार दामोदर होळकर हे करत आहे.