शिरूर भाजी बाजार येथे धक्का लागल्याच्या वादातून तरुणच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

9 Star News
0
शिरूर भाजी बाजार येथे धक्का लागल्याच्या वादातून तरुणच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार
शिरूर दिनांक प्रतिनिधी 
शिरूर शहरातील भाजीबाजार येथे चालताना धक्का लागला म्हणून झालेल्या वादातून तुला लय माज आलाय का असे म्हणत एकाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल कऱण्यात आहे.
         रमजान उर्फ टिपु आजम पटेल (वय 31 वर्ष धंदा प्लंबींग व्यवसाय रा. भाजीबाजार, शिरूर ता शिरूर जि पुणे) यांनी फिर्यादी आहे.
      गणेश गावडे (रा पाचर्णे मळा तर्डोबाची वाडी ता शिरूर जि पुणे) याच्या विरोधाची रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
      याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक १७ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता शिरूर शहरातील भाजीमार्केट येथील गल्लीमध्ये चालताना गणेश गावडे याचा फिर्यादीस धक्का लागल्याने फिर्यादी त्याला निट चाल म्हणाल्याचा राग आल्याने आरोपीने शिवीगाळ केली. त्यानंतर फिर्यादी व आरोपीची भांडणे तेथे जमलेल्या लोकानी सोडवली. त्यानंतर भाजीमार्केट गल्लीमध्ये फिर्यादी बसलेले असताना आरोपी गणेश गावडे हा त्या ठिकाणी आला व म्हणाला तुला लय माज आला आहे काय असे म्हणुन त्याने त्याचे जवळील कोणत्यातरी धारदार शस्त्राने फिर्यादीचे डोक्यात मारून जखमी केले व शिवीगाळ दमदाटी केली आहे. 
         याबाबत फिर्यादीच्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गिरी करीत आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!