स्वर्गीय रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना उद्याची २० सप्टेंबर रोजीची सर्वसाधारण सभा गाजणार

9 Star News
0
शिरूर दिनांक प्रतिनिधी 
        शिरूर तालुक्यातील स्वर्गीय रावसाहेब दादा घोडगंगा सहकारी साखर कारखान्याने दिनांक २० सप्टेंबर रोजी सर्व साधारणता सभा ठेवली आहे त्यामुळे दोन वर्षे बंद असलेल्या कारखान्यामुळे मोठा राडा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे कारखान्याच्या सर्वसाधारण सभेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. तर उद्याची सभा पोलिसांसाठी एक आव्हानच असणार आहे. 
ही सर्व साधारण सभा २० सप्टेंबर २४ दुपारी दोन वाजता न्हावरे ता शिरूर येथे कारखान्यावर सुरू होणार आहे. या सर्वसाधारण सभेसाठी फक्त सभासदांना आमंत्रित करण्यात आले आहे.
                सहा सप्टेंबर रोजी येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखाना जो राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या ताब्यात आहे. त्या कारखान्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये मोठा गोंधळ पाहिला मिळाला दोन गटामध्ये चक्क हाणामारी झाल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. दिलीप वळसे पाटलांच्या कारकिर्दीत प्रथमताच् अशा प्रकारची घटना घडली. 
       या घटनेची दखल घेता घोडगंगा कारखाना दोन गळीत हंगाम बंद याचा परिणाम या सर्वसाधारण सभेत उमटून मोठ्या प्रमाणात वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
              आता शिरूर तालुक्यातील रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाने दिनांक २० रोजी कारखान्याची सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. ही सर्वसाधारण सभा ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे.
      यामध्ये घोडगंगा कारखाना सुरू होणार आहे का नाही याबाबत ठोस माहिती मिळेल का? कारखाना बंद का झाला? कारखान्यात खरंच भ्रष्टाचार झाला का? यासह अनेक प्रश्न या या सर्वसाधारण सभेमध्ये महत्त्वाची ठरणार आहे. कारखाना बंद हा कळीचा मुद्दा असून विरोधक आणि ऊस उत्पादक शेतकरी सभासद याबाबत कारखान्याची चेअरमन ऋषीराज पवार व आमदार अशोक पवार यांना नक्कीच जाब विचारणार आहे. या अगोदरही अनेक वेळा घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत मोठ्या प्रमाणात राडा झालेला आहे. अंगावर शाही फेकण्यापासून ते माईक ओढाओढी ,धक्काबुक्की शिवीगाळ असे अनेक प्रकार या कारखान्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये झाले आहे.
         आता घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची होणारी सर्वसाधारण सभा या सर्व मुद्द्यांवर गाजणार तर आहेत परंतु या ठिकाणीही एकमेकांच्या अंगावर जाण्याच्या घटना घडू शकतात यामुळे शिरूरचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक संदेश केंजळे तसेच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, शिरूर उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांच्यापुढे मोठे आव्हान आहे. 
            या सर्वसाधारण सभेमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने सतर्क राहणे गरजेचे आहे अन्यथा मोठा राडा या सर्वसाधारण सभेमध्ये पाहायला मिळेल यात कुठली शंका नाही.
         उद्याच्या सर्वसाधारण सभेसाठी विरोधकांनी ही मोठी मोर्चे बांधणी केली आहे. उद्या सकाळी आमदार स्वर्गीय बाबुराव पाचर्णे यांच्या स्मृती स्थळावर नतमस्तक होऊन "संघर्ष घोडगंगाचा "म्हणत कार्यकर्ते जाणार सर्वसाधारण सभेला ....
        
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!