पिस्तुलच्या धाकाने अपहरण करणारा सात महिन्याने जेरबंदरांजणगावात एका महिलेसह सहा जणांनी युवकाचे केले होते अपहरण

9 Star News
0
पिस्तुलच्या धाकाने अपहरण करणारा सात महिन्याने जेरबंद
रांजणगावात एका महिलेसह सहा जणांनी युवकाचे केले होते अपहरण
शिरूर 
( प्रतिनिधी ) रांजणगाव गणपती ता. शिरुर येथून एका युवकाला त्याच्यावरील गुन्ह्याबाबत चर्चा करायचे सांगून पिस्तुलाचा धाक दाखवून अपहरण करुन कोयत्याने मारहाण करुन खुनाचा प्रयत्न केल्यानंतर तब्बल सात महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले असून प्रवीण दादाभाऊ वाळके असे या युवकाचे नाव आहे.
                        रांजणगाव गणपती ता. शिरुर येथील अजित ढेरंगे या युवकाला १४ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रवीण वाळके सह एक महिला आणि त्याच्या साथीदारांनी चर्चा करण्यासाठी बोलावून पिस्तुलाच्या धाकाने कारमध्ये बसवून दोरीने बांधून निर्जन स्थळी घेऊन जाऊन पिस्तुलाचा धाक दाखवून, कोयत्याने वार करुन लाकडी दांडक्याने मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला असता सदर घटनेत अजित ढेरंगे गंभीर जखमी झाल्याने त्यांना नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले, याबाबत अजित हनुमंत ढेरंगे वय २३ वर्षे रा. कुरुंद ता. पारनेर जि. अहमदनगर याने दिलेल्या फिर्यादीवरून रांजणगाव एमआयडीसि पोलिसांनी प्रवीण वाळके रा. बाभूळसर ता. शिरुर जि. पुणे, समीर उर्फ सोन्या तीरखुंडे, सागर तीरखुंडे, सुजाता संजय भोंडवे सर्व रा. भांबर्डे ता. शिरुर जि. पुणे, हर्षद गोसावी रा. बाबुरावनगर शिरुर ता. शिरुर जि. पुणे व जासूद ( पूर्ण नाव पत्ता माहित नाही ) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करत समीर उर्फ सोन्या तीरखुंडे, सागर तीरखुंडे, सुजाता संजय भोंडवे यांसह एका युवकाला अटक केली होती मात्र प्रवीण वाळके व हर्षद गोसावी फरार झालेले असताना नुकतेच प्रवीण वाळके निमगाव भोगी परिसरात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शिंदे व उमेश कुतवळ यांना मिळाली असता त्यांनी सापळा लावत प्रवीण दादाभाऊ वाळके वय २१ वर्षे रा. बाभूळसर खुर्द ता. शिरुर जि. पुणे याला अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शिंदे हे करत आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!