शिरूर
टाकळी हाजी ता शिरूर येथील चित्रा सुखदेव घोडे या शेतकरी कन्येने मोठ्या जिद्द व चिकाटीने पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे .
टाकळी हाजी ता शिरूर येथील सुखदेव घोडे हे स्वतः परिस्थिती व शेतीच्या कामामुळे शिक्षण घेऊ शकले नाहीत, मात्र त्यांनी मुलांना उच्च शिक्षित करण्याचा निर्धार केला . चित्रा हिचे प्राथमिक शिक्षण भैरवनाथवाडी , माळवाडी जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मुलिकादेवी विद्यालय निघोज येथे झाले . शिक्षण घेताना तिला अनंत कौंटुबिक अडथळ्याची शर्यत तिला पार करावी लागली .मात्र तिने हार मानली नाही . शिक्षण सुरूच ठेवत ,शास्त्र शाखेतून सन २०१८ मधे पदवी पुर्ण केली .तेथुनचं तिला स्पर्धा परीक्षा देण्याचे वेध लागले . तिने पुणे येथे स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी क्लास लावले . सातत्यांने राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देत पोलिस उपनिरीक्षक होण्यासाठी तिने प्रयत्न केले . अखेर यामधे खडतर अभ्यास करीत यश मिळविले आहे .या पुर्वी गावातील विद्या गंगाराम पवार,संगीता दगडू पोकळे,किशोरी हरिदास साबळे,वर्षाराणी जनार्दन साबळे,अजंता मारुती कि-हे या पाच मुली पोलिस उपनिरीक्षक झाल्या होत्या .त्याचाही आदर्श चित्रा हिच्या समोर होताचं . त्यात चित्रांने बाजी मारल्यांने गावातील सहा मुली पोलिस उपनिरीक्षक झाल्या आहेत . चित्रा हिचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे .
चौकट
वडीलांच स्वप्न होतं कि मी पोलिस अधिकारी व्हावं, त्यासाठी त्यांनी सदैव पाठबळ दिलं . माझ्या निवडीने आई - वडीलांचे स्वप्न साकार झाल्यांचा आनंद आहे .
चित्रा सुखदेव घोडे ( पोलिस उपनिरीक्षक )
फोटो : पोलिस उपनिरीक्षक म्हणुन निवड झाल्यानंतर टाकळी हाजी ता शिरूर येथील चित्रा घोडे आई वडीलांच्या समवेत