( प्रतिनिधी ) सणसवाडी ता. शिरुर येथील एका कंपनी चालकाला बनावट मेल आयडीद्वारे मेल मधून बिल पाठवून बिलाचे पंधरा लाख रुपये ऑनलाईन पद्धतीने मागवून घेत तब्बल पंधरा लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत संतोष सुधाकर खर्डेकर (वय ५२ वर्षे रा. खराडी पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केला
सणसवाडी ता. शिरुर येथे संतोष खर्डेकर यांच्या मालकीची एस एस खर्डेकर नावाने कंपनी असून कंपनीला लागणारा कच्चा माल खर्डेकर हे परदेशातून मागवून त्याचे बिल ऑनलाईन जमा करत असतात, ऑगस्ट मध्ये खर्डेकर माल मागवत असलेल्या कंपनीच्या नावाने एक मेल आला त्यामध्ये यापुढे कंपनीचे पैसे नवीन खात्यावर जमा करावे असे सांगत त्याखाली पंधरा लाखांचे बिल जोडलेले असल्याने खर्डेकर यांनी त्या खात्यावर पंधरा लाख रुपये जमा केले, मात्र त्यांनतर नुकतेच १६ सप्टेबर रोजी खर्डेकर यांनी सदर कंपनीचे बिल जमा केले नसून ते जमा करावे याबाबत पुन्हा मेला आल्याने खर्डेकर यांनी मेलवर तपासणी केली असता कोणीतरी बनावट मेल व बनावट बिल बनवून चुकीचे बँक डिटेल देऊन त्यामाध्यमातून खर्डेकर यांच्याकडून बिल घेऊन पंधरा लाखांची लाखांची फसवणूक केल्याचे लक्षात आले, याबाबत फिर्याद दिल्याने पोलिसांनी अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे हे करत आहे.