शिक्रापूर पोलीस ठाण्यात आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

9 Star News
0
शिक्रापूर पोलीस ठाण्यात आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न
शिरूर 
( प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर पोलीस स्टेशन एय्थे मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला नागरिकांनी पकडून आणल्यानंतर गुन्हा दाखल केला तर मी जीव देईल असे म्हणून खिडकीवर डोके आपटून एका आरोपीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून परमेश्वर नागनाथ धेवडे असे त्याचे नाव आहे.
        तर याबाबत पोलीस शिपाई प्रतिक भाऊसाहेब जगताप( रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन) येथे फिर्याद दिली आहे.
     पोलिसांनी परमेश्वर नागनाथ धेवडे (वय २४ वर्षे रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
                            शिक्रापूर ता. शिरुर पोलीस स्टेशन मध्ये पोलीस हवालदार बापू हाडगळे, पोलीस शिपाई प्रतिक जगताप, महिला पोलीस शिपाई काजल सरोदे हे त्यांचे कर्तव्य बजावत असताना एका युवतीचा मोबाईल हिसकावणाऱ्या परमेश्वर धेवडे या  इसमाला नागरिकांनी पकडून आणले असताना, सदर इसमाने फिर्यादी युवतीला तुला नवीन मोबाईल देतो असे म्हणत आरडाओरडा करुन पोलिसांना माझ्यावर गुन्हा दाखल करु नका नाहीतर मी जीवच देईल असे म्हणून पोलीस ठाण्यातील खिडकीवर जोरात डोके आपटून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, दरम्यान त्याच्या डोक्याला दुखापत होऊन रक्तस्त्राव होऊ लागल्याने पोलिसांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलवले, याबाबत पोलीस शिपाई प्रतिक जगताप यांनी फिर्याद दिली असून,
       पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रविकिरण जाधव हे करत आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!