रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील व्हर्लपूल कंपनी गोडाऊन मधून चोरी करणाऱ्या आठ जणांच्या मुसक्या आवळल्या ३७ लाखाचा ऐवज जप्त

9 Star News
0
शिरूर दिनांक प्रतिनिधी 
शिरूर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील व्हर्लपूल कंपनीच्या गोडाऊन मधून लाखो रुपयाचा माल चोरणाऱ्या आठ जणांच्या टोळीला रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून मायक्रो ओवन, एसी, फ्रिज, डिश वॉशर, वॉशर असे ३७ लाख १४ हजार २२० रुपयांचा ऐवज जप्त केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली आहे.

   रांजणगाव एमआयडीसी पोलिसांच्या या कामगिरीमुळे औद्योगिक वसाहतीमध्ये त्यांचे कौतुक होत आहे.
         बाळू रघुनाथ गायकवाड, (रा दरोडी ता पारनेर जि नगर),मयूर विलास सरोदे ( रा सरदवाडी ता शिरुर जि पुणे), संभाजी शिवाजी भोसले, (रा दरोडी ता पारनेर जि नगर),जावेद उर्फ गौसे अजम नजिर शेख (रा हुडको शिरुर ता शिरुर जि पुणे), रमेश रामभाऊ खराडे (रा कामाठीपुरा ता शिरुर जि पुणे), मुज्जफर रमजान शेख (वय २९ वर्ष रा दरोडी ता पारनेर जिल्हा अहमदनगर), सलीम मुनीर शेख (वय २८ वर्ष रा दरोडी ता पारनेर जिल्हा अहमदनगर),दिपक रामदास मस्कुले (वय ३२ वर्ष रा दरोडी ता पारनेर जिल्हा अहमदनगर)यांना पोलिसांनी अटक केली आहे.
      याबाबत कंपनिचे व्यवस्थापक संदीप नारायण पवार (रा. शिरूर ग्रीन सिटी, गोलेगाव रोड, तालुका शिरूर, जिल्हा पुणे) यांनी फिर्याद दिली होती.
      याबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे पोलीस स्टेशन हद्दीत रांजणगाव एमआयडीसी येथे व्हर्लपूल कंपनीचे इंडो लॉजिस्टिक पार्क बी 800  वेअर हाऊस गोडाऊन मधून जुलै २०२४ ते १२ ऑगस्ट दरम्यान  ओवन, एसी, फ्रिज, डिश वॉशर, वॉशर, असे एकूण किंमत २२ लाख ८८ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले ची फिर्याद दाखल झाल्याने या चोरीच्या गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी तपास करण्याचे आदेश दिले होते. रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी रांजणगाव पोलीस स्टेशनचे तपासकाला सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे पोलीस पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज नवसारे , सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस हवालदार विजय सरजीने, पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ यांना या गुन्ह्याच्या तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या तपासाच्या अनुषंगाने तांत्रिक माहितीनुसार व गोपनीय बातमीनुसार पोलीस पथकाने बाळू गायकवाड, मयूर सरोदे, संभाजी भोसले, जावेद शेख, रमेश खराडे, या आरोपींना सापळा रचून अटक करून चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली देऊन हा गुन्हा त्यांचे साथीदार मुजफ्फर शेख, सलीम शेख, दीपक मुस्कुले यांच्या साथीने केलेचे सांगितल्यावर या तीनही जणांना पोलिसांनी अटक केल्यावर सर्व आरोपींकडून चोरीतील ७१ एसी,  १९ डबल डोअर रेफ्रिजरेटर,  १६ वॉशिंग मशिन, १८ डिश वॉशर, ८५ मायक्रो ओवन, ९ सिंगल डोअर रेफ्रिजरेटर , ६ ईलेक्ट्रिक शेगडी असा एकूण ३७ लाख,१४ हजार २२० रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
         ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक  रमेश चोपडे, शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले  यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, पोलीस उपनिरीक्षक सविता काळे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस हवालदार विजय सरजिने, पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, पोलीस हवालदार विलास आंबेकर,  तेजस रासकर या पथकाने केली असून गुन्ह्याचा पुढील तपास रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज नवसारे करीत आहे.
 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!