इतरांना बदनाम करण्यापेक्षा घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद का पडला यांचे आत्मपरीक्षण आमदार ॲड . अशोक पवार यांनी करावे - दादापाटिल फराटे
सप्टेंबर १२, २०२४
0
शिरुर दिनांक ( वार्ताहर ) इतरांना बदनाम करण्यापेक्षा घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद का पडला यांचे आत्मपरीक्षण आमदार ॲड . अशोक पवार यांनी करावे असा सल्ला घोडगंगा साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व राष्ट्रवादीचे नेते दादापाटील फराटे यांनी दिला . शिरुर येथे घोडगंगा सहकारी कारखाना संदर्भात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे राज्य पदाधिकारी राजेंद्र कोरेकर , पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल पाचर्णे , घोडगंगा साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादापाटील फराटे , बाबासाहेब फराटे , सुधीर फराटे , भाजपाचे तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे , राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे , शिवसेनेचे तालुकाप्रमुख रामभाउ सासवडे , अनिल काशिद, सचिन मचाले ,अनिल बांडे ,संतोष वर्पे , मयूर थोरात आदी यावेळी उपस्थित होते . यावेळी दादा पाटील फराटे म्हणाले की आपणांस कारखाना नीट चालविता आला नाही त्याच्या ठपका नेत्यावर कसा ठेवता .आम्ही सन २०१२ पासून सांगतो की घोडगंगा सहकारी साखर कारखाना अडचणीत आहे . आज १२ वर्षानी कारखाना बंद पडला. इतरांना बदनाम करण्यापेक्षा कारखाना बंद का पडला यांचे आत्मपरीक्षण आमदारांनी करावे . कारखाना बंद पडून ही तुम्ही तालुक्यात कसे फिरु शकता असा सवाल करुन घोडगंगा कारखानास कर्ज मिळाले नाही याचा ठपका उपमुख्यमंत्री अजितदादा पवार वर का ठेवता असे ते म्हणाले . पीडीसी बॅक व्यंकटेश ला कर्ज देते मग घोडगंगाला का मिळत नाही . घोडगंगा का बंद पडला याचे उत्तर आमदाराना द्यावे लागेल असे फराटे म्हणाले . घोडगंगा साखर कारखाना उभारणीत शरद पवार व अजित पवार या दोन्हीचे योगदान असल्याचे फराटे म्हणाले . सुधीर फराटे म्हणाले की घोडगंगा कारखानाचा मागील हंगाम झाला नाही .घोडगंगा किसान क्रांती दवारे आम्ही कारखाना निवडणुक लढविली .त्यात ४७% मतदान पॅनलला झाले होते .२२ सप्टेंबर 2024 पासून पायी दौरा काढून घोडगंगा कारखाना वाचविण्यासाठी लढा सुरु करण्यात येणार असून 18 सप्टेंबरला माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या समाधी स्थळावर अभिवादन करुन मेळावा घेण्यात येणार आहे .एनसीडीसी कर्ज देताना कारखान्याचा ताळेबंद व अन्य बाबी पाहून कर्ज देते . घोडगंगा कारखान्याचा गेल्या वर्षीचा तोटा २१कोटी रु व यंदाचा ३१ मार्च २०२४ अखेरचा ४३ कोटी रुपयेचा असल्याचे फराटे यांनी सांगितले रवी काळे म्हणाले की आमदार खोटे नॅरेटिव्ह सेट करतात .घोडगंगाचा को जनरेशन प्रकल्पा साठी घोडगंगाच्या विस्तारीकरणाचा हालचाली का करण्यात आल्या नाही . खाजगी व्यंकटेश साखर कारखाना चे विस्तारीकरण होते व त्याचे कर्जाचे हप्ते जातात तर घोडगंगाची दुरावस्था होते . घोडगंगाची व्यवस्था नेमकी कशी झाली यांची पोलखोल या यात्रेचा माध्यमातून करण्यात येणार असल्याचा काळे म्हणाले . राहूल पाचर्णे म्हणाले की यापूर्वी सन २०१२ मध्ये घोडगंगाचा प्रश्नांवर माजी आमदार बाबूराव पाचर्णे पायी दौरा केला होता . आबासाहेब सोनवणे यांनी ही यावेळी मनोगत व्यक्त केली .
Tags