शिरूर आनंद नागरी सहकारी पतसंस्थे फसवणूक करणाऱ्या अभय चोरडिया यांच्या मालकीची चार चाकी दुचाकी वाहने केली पोलिसांनी जप्त चोरडिया बंधूंना मोठा झटका

9 Star News
0
शिरूर दिनांक प्रतिनिधी 
शिरूर शहरातील .आनंद नागरी सहकारी पंतसंस्थेच्या रक्कमेचा अपहार करणारे आरोपींची चारचाकी ,दुचाकी वाहने शिरूर पोलीसांनी केले जप्त केल्याने पतसंस्थेत फसवणूक करणाऱ्यांना मोठा झटका असून, नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. 
        या कारवाईमुळे अपहार करणाऱ्या अध्यक्षसह इतर आरोपींना हा मोठा झटका म्हणावा लागेल.
        याबाबत संजयकुमार राखाराम मुंडे, (वय ५६ वर्ष, रा.लेजर टाऊन, हडपसर, पुणे )यांनी फिर्याद दिली आहे.
        याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे फिर्यादीच्या फिर्यादीवर ३१डिसेंबर २०१३ ते दि. २० फेब्रुवारी २०२० या कालावधीमध्ये आनंद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शिरूर या संस्थेमधील अध्यक्ष, भागीदार व कामगार यांनी मिळून कट करून खोटे व बनावट दस्तऐवज तयार करून पतसंस्थेच्या सभासदांची व ठेवीदारांची एकुण १६ कोटी ७० लाख ५४ हजार ३६१ रुपये किंमतीची फसवणुक केली असल्याची फिर्यादी यांनी केलेल्या ऑडीट मध्ये निष्पन्न झाल्याने त्याबाबत त्यांचे फिर्यादीवरून दि.०९ जुलै २४ रोजी गुन्हा दाखल झालेला आहे.

महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९ कायदया अंतर्गत वरील गुन्हयातील आरोपीत यांचे व त्यांचे फर्मचे नावे असलेले पंधरा लाख रुपये किमतीचा एक लाल रंगाचा ट्रक नंबर एमएच १२ पीक्यु ६८८४ ही मेघहंस सेल्स फर्मचे (अभयकुमार चोरडीया व प्रविण चोरडीया) यांचे नावे असलेले जप्त ,८ लाख रुपये किमतीचा एक पांढरे रंगाचा टेम्पो क्रमांक एमएच १२ एनएक्स ८६३९ ही मेघहंस सेल्स फर्मचे (अभयकुमार चोरडीया व प्रविण चोरडीया) यांचे नावे असलेले. ८ लाख रुपये किमतीचा. एक पिवळया रंगाचा टेम्पो क्रमांक एमएच १२ क्युडब्ल्यु ४५३७ ही मेघहंस हंसराज अॅन्ड सन्स फर्म चे (अभयकुमार चोरडीया, प्रविण चोरडीया व इतर यांचे नावेअसलेले, ५ लाख रुपये किमतीचा एक पांढरे रंगाचा पिकअप क्रमांक एमएच १२ पीक्यु ६९३७ ही मेघराज हंसराज इंटरप्रायजेस फर्मचे (प्रविण चंपालाल चोरडीया) यांचे नावे असलेले , ४ लाख रुपये किमतीचा एक पांढरे रंगाचा टाटा कंपनीचा छोटा हत्ती क्रमांक एमएच १२ डब्ल्यु एक्स १११४ ही मेघराज हंसराज इंटरप्रायजेस फर्मचे (प्रविण चंपालाल चोरडीया) यांचे नावे असलेले , ३० हजार रुपये किमतीचा एक पांढरे रंगाची होंडा एक्टीव्हा स्कुटी मो. सायकल क्रमांक एमएच १२ एच वाय ६१३२ ही प्रविण चंपालाल चोरडीया यांचे नावे असलेली, ३० हजार रुपये किमतीची एक पांढरे रंगाची टीव्हीएस स्कुटी मोटर सायकल क्रमांक एमएच १२ एल क्यु ७५५२ ही प्रितम प्रविण चोरडीया यांचे नावे असलेली, ४० हजार रुपये किमतीची एक ग्रे रंगाची होंडा स्कुटी मोटर सायकल क्रमांक एमएच १२ आरआर ६९९७ ही सविता अभयकुमार चोरडीया यांचे नावे असलेली, ५० हजार रुपये किमतीचा एक काळया रंगाची टिव्हीएस जुपीटर स्कुटी मो. सायकल क्रमांक एमएच १२ पीके ६५४२ ही अभयकुमार पोपटलाल चोरडीया यांचे नावे असलेली अशा एकूण चार चाकी दुचाकी मिळून ४१ लाख ५० हजार रुपये किंमतीचा माल पोलिसांनी जप्त केला आहे.
     ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक करांडे, पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार, पोलीस हवालदार नितीन सुद्रिक, राहुल भवर, पोलीस अंमलदार आकाश नेमाने, वीरेंद्र सुंबे, ज्ञानदेव गोरे या पथकाने केली आहे.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!