शिक्रापूर ता. शिरूर येथील तीन वर्षीय चिमुरडीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ विविध सामाजिक संस्था व संतप्त नागरिकांनी मोर्चा काढून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली.
यावेळी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.
शिक्रापूर ता. शिरूर येथे तीन वर्षीय चिमूरडीवर अल्पवयीन युवकाकडून अत्याचार झाल्याची घडल्याने खळबळ उडाली, त्यानंतर आज विश्व हिंदू परिषदे बजरंग दल पदाधिकारी ,पंचक्रोशीतील हिंदू बांधव व शिक्रापूर ग्रामस्थांसह विविध संघटनांनी सदर घटनेबाबत निषेध मोर्चाचे आयोजन केले,
यावेळी शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे, उपसरपंच सारिका सासवडे,भाजप नेत्या जयश्री पलांडे, भाजपा किसान आघाडीचे प्रदेश सचिव जयेश शिंदे, शिवसेना तालुकाध्यक्ष रामभाऊ सासवडे, राष्ट्रवादी अजित पवार गट महिला जिल्हाध्यक्षा मोनिका हरगुडे, तालुकाध्यक्षा आरती भुजबळ, युवा सेना तालुकाध्यक्ष विजय लोखंडे, , बजरंग दल अध्यक्ष महेश चव्हाण, बाळासाहेब चव्हाण, सुरेश थोरात, सोमनाथ भुजबळ, भरत खोले, संकेत भांबुर्डेकर, हार्दिक गडदे, अशोक शहाणे, राजाभाऊ मांढरे, त्रिनयन कळमकर, कृष्णा सासवडे, मोहिनी मांढरे, पूजा भुजबळ, प्रदीप थोरात यांसह आदी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते, दरम्यान ग्रामस्थांनी घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत आरोपीला कठोरात कठोर शासन व्हावे तसेच अशा घटना घडू नये म्हणून शासनाने देखील कडक कायदा तयार करावा अशी मागणी करत सदर घटनेला कोणीही राजकीय वळण देण्याचे काम करु नये अशी विनंती करुन नागरिकांना सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन देखील केले आहे, तसेच पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केल्याने पोलिसांचे देखील आभार मानले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या नियंत्रणाखाली पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड व रांजणगाव एमआयडीसि पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.