शिरूर, दिनांक प्रतिनिधी
शिरूर तालुक्यासह पारनेर श्रीगोंदा या तालुक्यांनाही नवीन कॅथ लॅब सुविधा मुळे अत्याधुनिक हृदयरोग उपचार मिळून आरोग्यासाठी मोठा फायदा होणार असून हृदयरोग आजारासाठी ही सुविधा अतिशय उपयुक्त असणार तसेच वेळेत निदान झाल्याने नागरिकांना जीवनदायी ठरणार असल्याचे मत रुबी हॉल क्लिनिकचे विश्वस्त व फिजिशियन सायमन ग्रांट यांनी व्यक्त करून आरोग्य संदर्भातील उच्च दर्जाच्या सुविधाही पुरवणार असल्याचे सांगितले.
रूबी हॉल क्लिनिक व मातोश्री मदनबाई धारिवाल हॉस्पिटलच्या कार्डियाक सेंटरमध्ये फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रा.लि.च्या सीएसआर उपक्रमा अंतर्गत या कॅथ लॅबचे उद्घाटन फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रा.लि.(एफआयएपीएल) चे वरिष्ठ उपाध्यक्ष राकेश बवेजा आणि रूबी हॉल क्लिनिकचे विश्वस्त व फिजिशियन डॉ.सायमन ग्रांट यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी रूबी हॉल क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेहराम खोडाईजी, इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ.सीएन मखळे ,स्ट्रॅटेजी व बिझनेस डेव्हलपमेंट विभागाच्या प्रमुख न्याटली ग्रांट आणि हृदयरोग तज्ञ डॉ.हर्षल इंगळे, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
यावेळी रूबी हॉल क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेहराम खोडाईजी म्हणाले की,कॅथ लॅब ही केवळ सुविधा नसून शिरूर तालुक्यातील अनेक कुटुंबियांसाठी आशेचे प्रतीक आहे. अत्याधुनिक हृदयरोग चिकित्सा सुविधेमुळे नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि भविष्यासाठी लाभ दायी ठरणार आहे. शिरूरसारख्या ठिकाणी अप्रतिम पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल रसिकलाल धारिवाल यांच्या कुटुंबियांचे त्यांनी आभार मानले.
यावेळी बोलताना इंडिया ऑटोमोबाईल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष राकेश बवेजा म्हणाले शिरूर तालुक्यात व पुणे जिल्ह्यात शिक्षण पर्यावरण आणि ग्रामविकास उपक्रमांमध्ये आजपर्यंत 80 कोटी होऊन जास्त रुपयांची नागरिकांसाठीची कामे केली असून,कॅथ लॅब सारख्या अत्याधुनिक उपक्रमाला आमच्याकडून मदत होणे हे आमचे सामाजिक काम आहे याचा फायदा नागरिकांच्या आरोग्यासाठी व त्यांच्या जीवनासाठी व्हावा हे आमचे ध्येय आहे.
रूबी हॉल क्लिनिक तर्फे शिरूर तालुक्यातील आपल्या पहिल्या कॅथ लॅबचे उद्घाटन करण्यात आले आहे. मातोश्री मदनबाई धारिवाल हॉस्पिटलच्या कार्डियाक सेंटरमध्ये 26 सप्टेंबर 2024 रोजी सुरू करण्यात आलेली ही अत्याधुनिक सुविधा टाटा मोटर्स आणि स्टेलांटिसचा संयुक्त सहयोग असलेल्या फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रा.लि (एफआयएपीएल) आणि ग्रांट मेडिकल फाऊंडेशन (रूबी हॉल क्लिनिक) यांचा उपक्रम आहे. ही सुविधा म्हणजे शिरूर तालुक्यातील लोकांपर्यंत अद्ययावत हृदयरोग चिकित्सा पोहचविणे व त्याचबरोबर या भागात प्रतिबंधात्मक आरोग्याला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल आहे. ही सुविधा सुरू होण्याबरोबरच शिरूरमध्ये पहिल्यांदाच कोरोनरी अँजिओग्राम (सीएजी) प्रक्रिया करण्यात आली असून स्थानिक नागरिकांच्या आरोग्यसेवेतील हा महत्त्वाचा टप्पा आहे.
ही कॅथ लॅब सुरू होण्याआधी शिरूर तालुक्यातील रहिवाशांना प्रगत हृदयरोग उपचार मिळण्यात अनेक आव्हानांचा सामना करावा लागायचा. अँजिओग्राम,अँजिओप्लास्टी,पेसमेकर्सचे रोपण यासारख्या तातडीच्या हृदय प्रक्रियांसाठी पुणे किंवा इतर शहरांमध्ये जाण्याचा लांबचा प्रवास करावा लागायचा. गंभीर स्थितीतील उपचारांना विलंब झाल्यामुळे धोका अधिक बळावायचा. स्थानिक पातळीवर अद्ययावत सुविधा नसल्यामुळे उपचारासाठी जाण्यास लागणारे अंतर आणि आर्थिक भाराव्यतिरिक्त हृदयासंबंधित तातडीच्या परिस्थितीत चांगले परिणाम मिळण्यासाठी वेळेवर उपचार देखील प्राप्त व्हायचे नाही.मात्र आता निदान व हृदयरोग उपचाराशी संबंधित प्रक्रियांसाठी प्रगत सुविधा सुरू झाल्याने शिरूर तालुक्यातील रूग्णांना आपल्या घराजवळच जीवनदायी उपचार मिळू शकतात,