शिरुर (प्रतिनीधी) शिरुर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये गेल्या काही वर्षापासुन महिला सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या तसेच रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या संस्थापक-अध्यक्षा राणी कर्डिले यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळत आगळावेगळा उपक्रम राबवत माहेर संस्थेच्या सणसवाडी येथील माहेर संस्था संचालित करुनालय शाखेतील निराधार ,आजारी आणि वयोवृद्ध लोकांना जेवण देत अन्नदान केले.
राणी कर्डीले यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान करत समाजापुढे एक आदर्श समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कर्डीले यांनी आत्तापर्यंत आदिवासी कल्याण, वयात येणाऱ्या मुलींच्या मासिक पाळीच्या समस्या, वीटभट्टी वरील मुलांसाठी शाळा, तसेच चालते व फिरते वृद्धाश्रम चालवण्याचे कार्य करीत आहेत.तसेच वर्षभर मार्गदर्शन शिबिरे,वेगवेगळ्या उपक्रमामधून समाजात,रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या वतीने प्रेरणादाई पुरस्कार वितरण करत असतात.त्यांचा संस्थेच्या माध्यमातून नेहमी सामाजिक उपक्रम चालू असतात.जिथे गरज आहे तिथे त्या नेहमी मदतीला असतात.सर्व क्षेत्रात त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे.त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल त्यांना महाराष्ट्रातील विविध संस्थेमार्फत पुरस्कारही देण्यात आलेले आहेत.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक तालुकाध्यक्ष स्वप्निल गायकवाड, शिरुर शहरध्यक्षा गिता आढाव, उद्योजक बाळकृष्ण कर्डीले, संदीप कुटे, माहेर संस्थेचे संचालक रमेश दुतोंडे, क्रिडाशिक्षक प्रशांत गायकवाड, प्रिया ढोबळे, जेनिट सिस्टर, पत्रकार तेजस फडके आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रमेश दुतोंडे तर आभार विजय तवर यांनी केले.
आपण फटाके, पार्टी करुन वाढदिवस साजरे करतो. पण ज्या लोकांना बाहेरच्या जगात काय चाललय, आनंद काय असतो हे माहीत नसते. त्यामुळे माहेर संस्थेच्या लोकांमध्ये जाऊन माझा वाढदिवस साजरा केला. त्यामुळे मला खुपच मानसिक समाधान मिळाले. यापुढेही असेच सामाजिक काम करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न आहे. तसेच तुम्हाला जेव्हा कधी काही अडचण असेल तेव्हा नेहमीच मी माहेर संस्थेसोबत सोबत आहे.
राणी कर्डीले
(सामाजिक कार्यकर्त्या)