जातेगाव बुद्रुक ता. शिरुर येथे सुनेला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी सासऱ्यावर गून्हा

9 Star News
0
जातेगावात सासऱ्याकडून सुनेला दांडक्याने मारहाण 
शिरूर (  प्रतिनिधी ) 
जातेगाव बुद्रुक ता. शिरुर येथे सुनेला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी सासऱ्यावर शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
       याबाबत संगीता जितेंद्र सूर्यवंशी वय २९ वर्षे रा. जातेगाव बुद्रुक ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
       सुभाष नाना सूर्यवंशी रा. जातेगाव बुद्रुक ता. शिरुर जि. पुणे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
   याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे जातेगाव बुद्रुक ता. शिरुर येथील संगीता सूर्यवंशी यांनी सासरे सुभाष सूर्यवंशी यांना जेवण दिलेले असताना सुभाष यांनी जेवण केले नसल्याने संगीता यांनी जेवण करायचे नव्हते तर आधीच सांगायचे, स्वयंपाक कशाला करायला लावला सामान काय फुकट येते का असे म्हटले असता सुभाष यांनी सुनेला शिवीगाळ, दमदाटी करत लाखादी दांडक्याने डोक्यात मारहाण करत जखमी केले, याबाबत संगीता जितेंद्र सूर्यवंशी वय २९ वर्षे रा. जातेगाव बुद्रुक ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी सुभाष नाना सूर्यवंशी रा. जातेगाव बुद्रुक ता. शिरुर जि. पुणे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आजिनाथ शिंदे हे करत आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!