कासारीत बिबट्याने पाडला वासराचा फडशा

9 Star News
0
कासारीत बिबट्याने पाडला वासराचा फडशा
शिरूर (  प्रतिनिधी ) कासारी ता. शिरुर येथील शिंदे मळा येथील केरूभाऊ शिंदे हे रात्रीच्या सुमारास जनावरांना चारापाणी करुन झोपले असता, पहाटेच्या सुमारास शिंदे घरातून बाहेर आले त्यावेळी त्यांना घरापुढे गोठ्यात बांधलेली एक कालवड दिसली नाही त्यामुळे त्यांनी आजूबाजूला पाहिले असता बिबट्याने कालवड चा फडशा पाडल्याचे दिसून आले, याबाबतची माहिती वनरक्षक प्रमोद पाटील यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला यावेळी केरुभाऊ शिंद, संदीप शिंदे यांसह आदी उपस्थित होते, तर यावेळी येथे पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली असून लवकरच येथे पिंजरा लावण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे वनरक्षक प्रमोद पाटील यांनी सांगितले. तर घटना स्थळी विस्ताराधिकारी रामेश्वर राठोड यांनी देखील भेट देऊन घटनेची माहिती घेतली आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!