शिरूर शहरात सतरा कमानी आणि पुलाजवळ गुटख्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पो शिरूर पोलीस स्टेशनच्या पथकाने पकडला असून त्यामध्ये ५ लाख ४१ हजाराचा ऐवज पोलिसांनी जप्त केला असून दोघाना अटक केली आहे
. याबाबत रवि तात्याबा काळे, (पोलीस अंमलदार शिरूर पोलीस स्टेशन) यांनी फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी अक्षय भास्कर लाळगे, (वय २६वर्षे रा. निघोज ता. पारनेर जि. अहमदनगर) .हर्षद अनिल डोळसे, (वय २१ वर्षे रा. राळेगण थेरपाळ ता. पारणेर जि.अ.नगर ) यांना अटक केली आहे.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक ,१३ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शिरूर १७ कमानी पुलाजवळ टाटा कंपनीच्या टेम्पो क्रमांक एम एच १२ व्ही एफ ३२८६ त्यामधून गुटखा विक्रीसाठी घेऊन जाताना पोलीस पथकाने पकडले असून यामध्ये विमल पान मसाला चार पोती, व्ही १ कंपनीचे संगती तंबाखू २२८ पुडे, विमल पान मसाला पाच बॅग, सुगंधी व्ही वन पाच बॅग ,रजनिगंधा पान मसाला ५ बॉक्स,तुलसी कपनीचे सुगंधीत तंबाखुचे १० बॉक्स, असा एकूण २ लाख ४१ हजार रुपये किमतीचा गुटखा व ३ लाख रूपये किमतीचा एक टाटा कंपनीचा छोटा टेम्पो असा एकूण ५ लाख ४१ हजाराच्या ऐवज पोलिसांनी जप्त केला तर दोघा जणांना अटक करण्यात आली आहे या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली असून अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून,
पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हनुमंत गिरी करीत आहे.