शीर्षक नाही

9 Star News
0
माहेर संस्थेच्या नावे लग्नास मुलींच्या आमिषाने फसवणूक
नागरिकांनी अमिषाला बळी न पडण्याचे माहेर संस्थचे आवाहन
लग्ना जमविण्यासाठी मुलांकडून पैसे घेतल्याचे प्रकार उघडकीस
शिरूर 
(  प्रतिनिधी ) सध्या अनेक ठिकाणी लग्नासाठी मुली भेटत अल्स्याने अनेकजण वेगवेगळ्या संस्था व वधू वर सूचक केंद्राचा अवलंब करत असताना पुणे जिल्हातील माहेर संस्थेच्या नावाने लग्नासाठी मुली देतो असे भासवून अनेकांकडून पैसे उकळल्याच्या घटना घडत असल्याने नागरिकांनी अमिषाला बळी न पडण्याचे आवाहन माहेर संस्थच्या वतीने करण्यात आले आहे.
                            वढू बुद्रुक ता. शिरुर येथील माहेर संस्थेच्या माध्यमातून अनेक अनाथ मुला मुलींचा सांभाळ करुन त्यांना स्वावलंबी बनवले जात असताना दोनशे जणांचे विवाह देखील मोफत करुन देण्यात आलेले असताना, सध्या पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी फिरणारे युवक व युवती हे माहेर संस्थेचे पदाधिकारी असल्याचे सांगून आम्ही मुलांचे लग्न करुन देत असल्याचे भासवून अनेकांकडून हजारो रुपये घेऊन नंतर फरार होत असल्याच्या घटना घडत असल्याने त्याबाबत काही तक्रारी देखील माहेर संस्थेकडे प्राप्त झाल्या असल्याने याबाबत माहेर संस्थेच्या वतीने शिक्रापूर पोलिसांकडे काही पुराव्यांsh तक्रार देण्यात आली आहे, मात्र माहेर संस्थेच्या वतीने कोणत्याही मुला मुलींचे विवाह करुन देताना कोणत्याची स्वरुपाची रक्कम स्विकारली जात नसून नागरिकांनी लग्नासाठी मुलगी शोधत असताना कोठेही आपली फसवणूक होणार नाही याची दक्षता घेऊन कोणाच्याही अमिषाला बळी पडू नये असे आवाहन माहेर संस्थेच्या संस्थापिका लुसि कुरियन व अध्यक्षा हिराबेगम मुल्ला यांनी केले आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!