रांजणगाव सांडस, लोखंडे वस्ती, ता. शिरूर येथे रस्त्याच्या वादातून तिघांना मारहाण

9 Star News
0
शिरूर प्रतिनिधी 
रांजणगाव सांडस, लोखंडे वस्ती, ता. शिरूर येथे हा रस्ता आमच्या खाजगी मालकीचा आहे येथून जायचे नाही तसेच आमच्या विरोधात केलेली केस माघारी घेतली नाही तरी तुला जिवंत सोडणार नाही असा दम देत तिघांना उसाने व दगडाने मारहाण करून जखमी केले आहे याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
        संभाजी दशरथ शितोळे (वय 30 वर्षे, रा. रांजणगाव सांडस, लोखंडे वस्ती, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
        याबाबत प्रशांत सुरेश रणदिवे, सुरेश चंदर रणदिवे,अनिल उर्फ बाबु सुरेश रणदिवे (सर्व रा. राजनगाव सांडस, ता. शिरूर, जि. पुणे ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
          याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे २३ सप्टेंबर सकाळी साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान रांजणगाव सांडस ता. शिरूर, जि. पुणे गावचे हद्दीत जमीन गट १०५ मधील रस्त्यावरून फिर्यादी व त्यांचे चुलते बाळासाहेब, व चुलत भाऊ तानाजी असे जात असताना आरोपी प्रशांत, सुरेश , अनिल उर्फ बाबु यांनी या रस्त्याने जायचे नाही. हा रस्ता आमचे खाजगी मालकीचा आहे असे म्हणून उसाने फिर्यादी व त्यांचा चुलतभाउ तानाजी यांना मारहान केली आहे तसेच तानाजी यास प्रशांत रणदिवे यांने दगड फेकुण मारून तुम्ही आमचेविरूद्ध केलेले केसेस माघारी घे नाहीतर पुन्हा तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देवुन निघुन गेले याबाबत फिर्यादीवरून शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जाधव करीत आहे.
आहेत म्हणुन त्याचेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!