शिरूर प्रतिनीधी
रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्था व शिरूर तालुका डॉट कॉम यांच्या संयुक्त विद्यमाने गणपती सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक मेघा गायकवाड, घरगुती गौरी सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक वैशाली हारके यांनी पटकावला आहे.
कार्यक्रमाची सुरवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.
यावेळी प्रमुख उपस्थिती पंचायत समिती गटविकास अधिकारी महेश डोके यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
या स्पर्धेचे परीक्षक म्हणून शर्मिला नीचित यांनी काम पाहिले.
सर्वच ठिकाणी सण उत्सव मोठ्या आनंदात साजरे केले जातात,त्यातील गणपती बाप्पा चे आगमन मोठ्या उत्साहात 10 दिवस साजरे केले जातात.
या काळात अनेक ठिकाणी सजावट खूप छान असतात,परंतु प्रदूषण विरहित सजावट,स्वतः घरगुती हाताने टिकाऊ पासून टाकाऊ केलेली सजावट व्हावी,महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा,त्यांना प्रेरणा मिळावी ,त्यांचा कलेचे कौतुक व्हावे म्हणून त्यांचे नंबर काढून,त्यांना ट्रॉफी व भेटवस्तू देऊन सन्मानित केले.सहभागी सर्वांना ट्रॉफी देऊन सन्मानित केले.
त्यांनीही रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या कार्याचे कौतुक करून,उपस्थित सर्वांचे अभिनंदन करून,शुभेच्छा दिल्या.
यावेळी गौरी सजावट स्पर्धेतील विजेते पुढील प्रमाणे
प्रथम क्रमांक वैशाली हारके,द्वितीय क्रमांक प्रियंका कोठारी,तृतीय क्रमांक - शोभा मचाले, चतुर्थ क्रमांक मनीषा कालेवार,पाचवा क्रमांक गौरी घावटे
गणपती सजावट स्पर्धेतील विजेते पुढील प्रमाणे
प्रथम क्रमांक मेघा गायकवाड,द्वितीय क्रमांक इंद्रजित थोरात,तिसरा क्रमांक सौदामिनी शेटे, चतुर्थ क्रमांक प्रतीक्षा भावटणकर,पाचवा क्रमांक अद्वैत पाटील यांना देण्यात आला.
सर्व विजेत्यांना यांना सन्मान चिन्ह, देऊन गौरवण्यात आले.
यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघ प्रेदशअ ध्यक्षा शोभना पाचंगे,सामाजिक कार्यकर्ते - गणेश देशमुख, नानासाहेब काळे,सागर नरवडे,कलीम सय्यद,वृषभ मुथा,अक्षय सोनवणे, पत्रकार संजीवनी कदम, अरुण मोटे,रेशमा शेख,राणी शिंदे, डॉ .वैशाली साखरे,कल्पना चांदगुडे,दुर्गा ननवरे,शीतल शर्मा,भाग्यश्री लिंगे,ललिता पोळ,मनीषा टेभेकर,अनुपमा दोषी, सुवर्णा सोनवणे,आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी केले.सूत्रसंचालन पत्रकार तेजस फडके यांनी केले.