शिरूर जि.पुणे ते छत्रपती संभाजीनगर या नवीन ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्गाची उभारणी करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. २०५ किलोमीटरच्या या मार्गासाठी १४ हजार ८८६ कोटी रुपये खर्च येणार आहे.
बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा, या तत्त्वावर या मार्गाची उभारणी केली जाणार आहे. तो पूर्ण झाल्यानंतर पथकराची वसुली सुरू करण्यात येणार आहे. या मार्गासाठी २ हजार ६३३ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. पुण्यापासून शिरूरपर्यंत उन्नत (एलिव्हेटेड रोड) बांधण्यात येईल, तो ५३ किलोमीटरचा असेल आणि तो ग्रीनफिल्ड मार्गाशी जोडला जाईल. तसेच ग्रीनफिल्ड मार्ग हा छत्रपती संभाजीनगरनजीक समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार आहे. हे काम महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाच्या माध्यमातून करण्यात
पुणे ते शिरूर हा उन्नत मार्ग ७,५१५ कोटी रुपये खर्चुन उभारला जाणार आहे. या प्रकल्पाच्या खर्चाची ७० टक्के रक्कम वित्तीय पुरवठा करणाऱ्या संस्थांकडून कर्जाद्वारे, तर ३० टक्के रक्कम संस्थात्मक कर्जाद्वारे उभारली जाणार आहे.
येणार आहे. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी ग्रीनफिल्ड महामार्गाबाबत माहिती दिली.
पुणे ते शिरूर हा उन्नत मार्ग ७,५१५ कोटी रुपये खर्चुन उभारला जाणार आहे. या प्रकल्पाच्या खर्चाची ७० टक्के रक्कम वित्तीय पुरवठा करणाऱ्या संस्थांकडून कर्जाद्वारे, तर ३० टक्के रक्कम संस्थात्मक कर्जाद्वारे उभारली जाणार आहे.
'समृद्धी'ला जोडणार ■ सध्याचा जो शिरूर-छत्रपती संभाजीनगर महामार्ग आहे, त्याच्या बहुतांश समांतर ग्रीनफिल्ड मार्ग असेल. पण शिरूर, अहमदनगर, पैठण, बिडकीन, येथून पुढे छत्रपती संभाजीनगरन- जीकच्या शेंद्रा एमआयडीसीत त्याचा शेवट होणार आहे. शेंद्रा एमआयडीसी मार्गे तो समृद्धी महामार्गाला जोडला जाईल. डीएमआयसीमधील बिडकीन आणि शेंद्रा या दोन्ही औद्योगिक वसाहतींना हा महामार्ग जोडल्या जाईल.
शिरूर ते छत्रपती संभाजीनगर या नवीन ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्गास मंजुरी. या 205 किलोमीटरच्या द्रुतगती मार्गास 14 हजार 886 कोटी रुपये खर्च येईल. या मार्गाचे काम बीओटी तत्वावर होणार असून काम पूर्ण झाल्यानंतर 2008च्या पथकर धोरणानुसार वाहनांवर पथकर लावण्यात येईल.