शिरूर
( प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर येथील आठवडे बाजारात आई वडिलांसोबत आलेला बालक अचानक चुकून भटकत असताना त्या बालकाच्या आई वडिलांचा सोशल मीडियातून शोध घेऊन बालकाला आई वडिलांच्या स्वाधीन देण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले असून शिवानी कुमार असे या बालिकेचे नाव आहे.
शिक्रापूर ता. शिरुर येथील आठवडे बाजारात अशोक कुमार ते त्यांच्या कुटुंबियांसह आलेले असताना त्यांची सहा वर्षीय बालिका गर्दीमध्ये आईचा हात सुटल्याने इतरत्र फिरू लागल्याने रडू लागली, यावेळी काही नागरिकांनी त्या बालिकेला शिक्रापूर पोलिसांच्या स्वाधीन केले, दरम्यान पोलीस हवालदार मंगेश लांडगे, उद्धव भालेराव यांनी त्या बालिकेचा फोटो सोशल मिडीयावर प्रसारित करत नागरिकांना तिच्या आई वडिलांचा शोध घेण्याबाबत आवाहन केले असता तब्बल दीड तासाने सोशल मीडियातील फोटो पाहून काही नागरिकांनी तिच्या आई वडिलांना माहिती दिल्या नंतर आपल्या बालिकेला शोधणारे आई वडील थेट पोलीस स्टेशन मध्ये हजर झाले आणि आपल्या मुलीला सुखरूप पाहून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले, यावेळी शिवानीच्या आई वडिलांनी पोलिसांचे आभार मानले.
फोटो खालील ओळ – शिक्रापूर या. शिरुर येथे हरवलेली बालिका आई वडिलांच्या स्वाधीन करताना पोलीस.