शिरूर
( प्रतिनिधी ) सकल धनगर समाज एस टी आरक्षण अंमलबजावणी पंढरपूर येथे सुरु असलेल्या उपोषणास पाठींबा देण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने पुणे नगर महामार्गावरील न्हावरा फाटा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने नुकतेच पुणे नगर महामार्गावरील न्हावरा फाटा येथे धनगर समाज एस टी आरक्षण अंमलबजावणी पंढरपूर येथे सुरु असलेल्या उपोषणास पाठींबा देत आंदोलन करण्यात आले, यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवाजी कुऱ्हाडे, यशवंत सेनेचे अध्यक्ष रामकृष्ण बिडकर, घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे, माजी सभापती दादासाहेब कोळपे, लक्ष्मण येळे, यमराज शिंदे, राजू पुणेकर, संपत मोटे, अविनाश पोकळे, प्रमोद कांदळकर, चांगदेव पिंगळे, गोरख तांबे, कैलास कोकरे, हनुमंत उकले, चंद्रकांत गायकवाड यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते, दरम्यान शासनाने धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाबाबत तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी आंदोलकांच्या वतीने करण्यात आले.
फोटो खालील ओळ - पुणे नगर महामार्गावरील न्हावरा फाटा येथे संपन्न झालेले रासपचे आंदोलन.