शिरूर तालुका काँग्रेस आणि शिरूर शहर काँग्रेस यांचे वतीने काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे विरुद्ध अपमान जनक वक्तव्य करणारे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड याचा निषेध करून त्याच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन शिरूर तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी शिरूर तालुका काँग्रेस अध्यक्ष वैभव यादव, शिरूर तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष प्रियंका बंडगर, शिरूर तालुका किसन काँग्रेस अध्यक्ष रामदास थोरात, डॉ. सुजित शेलार, शिरूर तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष अजीमभाई सय्यद, शिरूर तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष संकेत गवारे,शिरूर शहर अध्यक्ष ॲड.किरण आंबेकर शिरूर तालुका कार्याध्यक्ष संतोष गव्हाणे, शिरूर शहर युवक अध्यक्ष अमजद पठाण, कयूम शेख, विजय जगधने, विजय गव्हाणे, सतीश गव्हाणे, किसन पवार, रशीद शेख, विशाल शिंदे, महेंद्र सोनार, सागरजी शेलार, प्रमोद थोरात, विकास थोरात, अजीम खान, शहजाद अन्सारी, बरकत अन्सारी, अश्फाक शहा, समीर शिंदे, राहुल पवार, बाळा राजगुरू, दत्ता कोठावळे, संदीप जाधव, प्रदीप मोरे, सुरेश लोणारे, दीपक उपाध्याय व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या विरोधात अपमानास्पद वक्तव्य करून त्यांची अल्पजीवी बुद्धी असल्याचे दाखवून दिले आहे. अशा गद्दार आमदार विरुद्ध खटला दाखल करण्याची मागणी केली.
ॲड किरण आंबेकर, शहराध्यक्ष काँग्रेस