सणसवाडीत पोलीस हवालदार रविकिरण जाधवांची कामगिरी
( प्रतिनिधी ) सणसवाडी ता. शिरुर येथे गणपती विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आलेली आणि गर्दीमुळे हरवलेली बालिका पोलीस हवालदार रविकिरण जाधव यांनी आई सह पालकांच्या स्वाधीन केली असून पल्लवी राजेंद्र पांडे असे त्या बालिकेचे नाव आहे.
सणसवाडी ता. शिरुर येथे गणपती विसर्जन मिरवणूक सुरु असताना घरापासून मिरवणूक पाहण्यासाठी चार वर्षीय पल्लवी आलेली असताना अंधारामध्ये ती चुकून रस्त्याने रडत इकडेतिकडे पळू लागली यावेळी येथील नागरिकांनी याबाबतची माहिती पोलीस हवालदार रविकिरण जाधव यांना दिल्यानंतर जाधव यांनी त्या बालिकेला जवळ घेऊन तिला खाऊ देत तिची विचारपूस केली, त्यावेळी तिने वडिलांचे नाव राजेंद्र पांडे असे सांगून ते भंगाराच्या दुकानात काम करतात असे सांगितल्याने जाधव यांनी त्या बालिकेला दुचाकीवर बसवून परिसरातील भंगारांच्या दुकानात जाऊन बालिकेच्या वडिलांचा शोध घेण्यास सुरुवात केली असता तब्बल एका तासाने एका दुकानातील कामगाराने त्या बालिकेला ओळखले आणि पोलीस हवालदार रविकिरण जाधव यांच्यासह तिच्या घरी जात पल्लवीला तिची आई रीना राजेंद्र पांडे यांच्या केले, यावेळी तिच्या आईने आपल्या मुलीला पाहून पोलीस हवालदार रविकिरण जाधव यांना हात जोडत तुम हमारे लिये पोलीस नाही गणेशजी म्हणजेच गणपती बाप्पा असल्याची भावना व्यक्त करत त्यांचे आभार मानले, तर पल्लवी या बालिकेने ने रविकिरण जाधव यांना स्मितहास्य करत टाटा केला, तर बालिकेला सुखरूप आईच्या ताब्यात दिल्याचे समाधान सुद्धा पोलीस हवालदार रविकिरण जाधव यांच्या चेहऱ्यावर दिसून आले.
फोटो खालील ओळ – सणसवाडी ता. शिरुर येथे चुकलेल्या बालिकेला दुचाकीहून घेऊन पालकांच्या शोधात निघालेले पोलीस.