शिरूर येथे गणेश विसर्जन मिरवणूक १५ तास... मोठ्या उत्साहात गणरायाला निरोप तर दहा दिवस पाऊस नपडल्याची खंत

9 Star News
0
शिरूर दिनांक प्रतिनिधी 
     ढोल ताशाच्या गजरात..... ढोल पथकाच्या व झांज पथकाच्या दणक्यात... ब्रास बँडच्या सुमधूर संगीतात.. आकर्षक देखावे... मनमोहक विद्युत रोषणाई... फुलांचे रथ... अश्वांच्या बग्गीतील गणराय... गुलाबाची उधळण तर कागदी ब्लास्ट आणि महिला व चिमुरड्यांचा मोठा सहभाग जोडीला उत्साह ..गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात जड अंतकरणाने गणरायाला निरोप देण्यात आला... यंदाची गणेश विसर्जन रवणूक १५ तासाहून जास्त वेळ रंगली होती.        यंदाच्या गणेश उत्सवामधील दहा दिवस वरूनराजाने पाठ फिरवल्याने नागरिकांच्या मनामध्ये ही खंत अनेकांनी बोलून दाखविली.
      तर अजिंक्यतारा मित्र मंडळाच्या वतीने महिला अत्याचार करणाऱ्याला फाशी द्या अशी मागणी करीत आमचे छत्रपती शिवाजी महाराज असते तर भर चौकात त्याला फासावर लटकवले असते अशा प्रकारच्या पाट्या मिरवणुकीमध्ये दाखवल्या.
      शिरूर शहराचे नेते प्रसिद्ध उद्योगपती प्रकाशभाऊ धारीवाल यांच्यावतीने प्रत्येक मंडळांना भेटी देऊन मंडळांचा सत्कार करण्यात आला.
 यावेळी माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, शिरूर विकास आघाडीचे अध्यक्ष सुभाष पवार, माजी नगरसेवक मुजफ्फर कुरेशी, विठ्ठल पवार, आजीमाजी नगरसेवक कार्यकर्ते उपस्थित होते.
        शिरूर शहरातील मानाचा पहिला गणपती श्रीराम मंदिर रामआळी या गणेशाची दुपारी बारा वाजता शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे व ज्येष्ठ पत्रकार नितीन बारवकर ,मुकुंद ढोबळे, सतीश धुमाळ, संतोष शिंदे ,अर्जुन बढे, मंदिराचे ट्रस्टी बगाडे, राजेंद्र क्षीरसागर, सिद्धेश्वर बगाडे, विवेक बगाडे, महेश बोत्रे संकेत गुजर अनिल घावटे,प्रसाद पाटेकर यांच्या उपस्थित आरती होऊन गणराज मिरवणुकीसाठी प्रस्थान केले. 
       त्यानंतर मानाचा दुसरा गणपती श्री शिवसेवा मंदिर या गणरायाची आरती विश्वस्त सुभाष पवार, सुरेश खांडरे श्रीनिवास परदेशी, ज्ञानेश्वर घावटे यांच्या हस्ते आरती होऊन गणेश विसर्जनासाठी प्रस्थान केले. 
         मानाचा तिसरा गणपती हनुमान मित्र मंडळ मारुती आळी यांनी सायंकाळी सहा वाजता गणेशाची आरती करून मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला. मानाचा चौथा गणपती श्री विठ्ठल मंदिर कुंभारआळी यांनी सायंकाळी गणेशाची आरती करून मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला. मानाचा चौथा गणपती विठ्ठल मंदिर कुंभारआळी यांनी सायंकाळी विश्वस्ता व गणेश मंडळाचे कार्यकर्ते यांच्या हस्ते आरती करून मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला.
      शिरूर शहरातील विसर्जन मिरवणुकीमध्ये नागरिकांना पूर्वमुखी सोनारआळी (गोल्डन गल्लीचा राजा) गणेश मिञ मंडळ आकर्षित करणारा देखावा ठरला आहे आकर्षक हनुमानाची मूर्ती जय श्रीराम घोषवाक् गणराय विराजमान श्रीकृष्णाची शेषनागा वरील लिला पाठीमागे स्क्रीन यामुळे हा देखावा नागरिकांची लक्ष वेधून घेतले तर मन उत्साहीत केले.
      युवा गोपाल तालीम गणेश मित्र मंडळ यांनी यंदा प्रभू श्रीरामाची आकर्षक मूर्तीने विसर्जन मिरवणुकीचे लक्ष वेधले.
        शिरूर शहराचा राजा म्हणून ओळखला जाणारा आझाद हिंद गणेश मंडळाच्या वतीने यंदाही दरवर्षीप्रमाणे आकर्षक फिरत्या रंगाचे विद्युत रोषणाई मंदिर नागरीकांचा उत्साह वाढवत होता. हलवाई चौकाचा राजा यंदा श्रीकृष्ण रथात विराजमान झाला होता. हनुमान मित्र मंडळ मारुती आणि यांचे यंदा शंभरावे वर्ष असल्याने गणराज शिवशंकर रथामध्ये विराजमान झाला होता. संभाजीनगर मित्र मंडळ हुडको कॉलनी चा गणराज सूर्य रथामध्ये विराजमान होता. रसिकभाऊ धारीवाल मित्र मंडळ आडत बाजार यांनी आकर्षक कलाकृसरीचे सिंह रथात गणराजमान केले होते. मुंजोबा गणेश मित्र मंडळ भाजी बाजार यांनी स्वामी समर्थ रथामध्ये गणराज विराजमान केले होते. अखिल रामायण मित्र मंडळ यांनी यंदा शंकराची मूर्ती विसर्जन मिरवणुकीत आकर्षण ठरली.श्री गोपाल मोठी तालीम गणेश मित्र मंडळाच्या श्री गणेश राजहंस अर्थात विराजमान होता . अजिक्य तारा मित्र मंडळ व आझाद सोशल अँड फाउंडेशन लाटेआळी यांचा गणराया अश्वांच्या रथामध्ये विराजमान होता.मुंजोबा मंदिर भाजी बाजार गणेश मित्र मंडळ यांची श्री. गणेशाची मुर्ती श्रीराम रथात विराजमान होती ,श्री रामलिंग पाबळ फाटा गणेश मित्र मंडळाची गणेश मुर्ती आकर्षक रथात विराजमान होती . सिध्दार्थ प्रतिष्ठान शांतीनगर यांच्या श्री गणेशी मूर्ती आकर्षक रथात विराजमान होता . रामलिंग गणेश मित्र मंडळ करंजुले नगर यांनी विसर्जन मिरवणूकीसाठी गजपुष्प असा आकर्षक रथ बनविला होता. त्रिमूर्ती गणेश मित्र मंडळ रेव्हन्यू कॉलनी यांनी सुंदर असे मंदिर विसर्जन मिरवणूकी साठी केले होते . हनुमान गणेश मित्र मंडळ कामाठीपुरा यांच्या श्रीगणेशाच्या विसर्जन मिरवणूकीसाठी आकर्षक असे विद्युतरोषणाईचे मंदिर केले होते , जय भवानी गणेश मंडळकाची आळी यांनी यंदाही आकर्षक रथातून मिरवणूक काढली होती.
  कापड बाजार मित्रमडळांनी दुपारी बारा वाजता आरती करून आकर्षक फुलांच्या रथामध्ये गणरायाची मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला. छत्रपती शिवाजी गणेश मित्र मंड्ळ लाटे आळी, राजमाता मित्र मंडळ मंगलमुर्ती नगर , सूरज नगर मित्र मंड्ळ या मंडळाच्या गणेशाचे विसर्जन ही सायंकाळी झाले . हनुमान मंदिर मित्र मंडळ व महाराणा प्रताप गणेश मित्र मंडळ मुंबई बाजार यांनी पारंपारिक पध्द्तीने पालखीतून गणेशाची मूर्ती विसर्जनसाठी नेली. तर डंबेनाला गणेश मित्र मंडळ यशवंतराव चव्हाण चौक यांनी टाळ मुदृगाचा गजरात दिंडी सह विसर्जन मिरवणूक काढली 
       शहरातील बाल गणेश मंडळ व घरगुती गणेशाची सकाळी सात वाजल्यापासूनच कुंभार घाट शनी घाट रयत शाळा मैदान या ठिकाणी विसर्जन करण्यासाठी गर्दी केली होती.
        त्यानंतर सायंकाळी चार नंतर शिरूर शहरातील अनेक मंडळांनी विद्युत रोषणाई व आकर्षक देखावे असल्याने मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला. शिरूर शहरातील शनी मंदिर येथील विसर्जन घाटावर मोठ्या प्रमाणात नागरिक गणेश मूर्ती दान करत होते तर एकीकडे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या विनंतीवरून अनेक जण मी बाप्पा पेक्षा मोठा नाही असे म्हणत नदीपात्रात होडीतून गणेश विसर्जन करताना दिसून येत होते. 
         तर वासल्य सिंधू फाउंडेशन च वतीने गणेश मूर्ती दान घेत होते यावेळी उषा वाखारे व त्यांच्या सहकारी दान करणाऱ्या गणेश मूर्ती स्वीकारत होत्या.
         रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील अवेंट कंपनीतील 150 स्वयंसेवक (कामगार) गणेश विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांना पर्यावरणाचे महत्त्व सांगून निर्माल्य नगरपरिषदेने तयार केलेल्या कुंडामध्ये टाकावे अशी विनंती करताना दिसून आले.
      शिरूर पोलीस स्टेशन यांच्या वतीने शहरातील ठीक ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आला होता तर पोलीस निरीक्षक संदेश केंजळे स्वतः हजर राहून गणेश विसर्जन मिरवणूक लवकर सुरू होण्यासाठी शहरातील गणेश मंडळ यांना विनंती आदेश देत होते.
      शिरुर शहरातील हलवाई चौक येथे शिरुर नगरपरिषद मुख्याधिकारी स्मिता काळे व शिरुर पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरक्षक संदेश केंजळे यांनी गणेश मंडळाच स्वागत केले. शिरुरचे उपविभागीय पोलीस आधिकारी पोलीस प्रशांत ढोले व पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!