शिरूर नगर परिषदेने शहरात उघड्या व मोकळ्या जागेत कचरा टाकणारे आढळल्यास पन्नास हजार रुपये दंड करणार असल्याची जाहिरात देऊन जाहीर केले आहे. स्वच्छ शिरूर व सुंदर शिरूर होण्यासाठी हा दंड योग्यच आहे .कारण प्रत्येक ठिकाणी नगर परिषदेची घंटागाडी येत आहे आणि कर्मचारी प्रामाणिकपणे काम करत आहे. यात तूसभरही शंका नाही परंतु शिरूर शहरात अनेक ठिकाणी विद्युत तारांच्या आड येणाऱ्या फांद्या छाटून तर काही ठिकाणी झाडे तोडून त्याच्या फांद्या मोकळ्या जागी टाकून दिल्या आहेत.गेल्या महिन्यापासून काही ठिकाणी तर काही ठिकाणी आठ दिवसांपासून अस्वच्छता केली आहे. त्यांना पन्नास हजाराचा दंड करणार का? मुख्याधिकारी साहेब.... स्वच्छ शिरूर सुंदर शिरूर आता अस्वच्छ शिरूर ...अस्वच्छ शहर... झाले आहे.
शिरूर शहरामध्ये शिरूर नगर परिषदेच्या वतीने स्वच्छ शिरूर सुंदर शिरूर या संकल्पने आधारित स्वच्छता मोहीम राबवली जाते. त्यात शिरूर शहरातील प्रत्येक भागात शिरूर नगर परिषदेच्या वतीने ओला व सुका कचरा वेगवेगळ्या करण्यासाठी घंटागाडी येत असते. तरीही काही नागरिक कचरा उघड्यावर टाकतात हे चुकीचे आहे. म्हणून शिरूर नगर परिषदेच्या वतीने आता वर्तमानपत्रात जाहिरात देऊ उघड्या मैदानावर कचरा टाकताना आढळल्यास पन्नास हजार रुपये दंड करण्यात येईल अशी सक्त ताकीद वर्तमानपत्रातून दिली आहे. कदाचित ती योग्य आहे.
परंतु गेल्या काही दिवसांपासून शिरूर नगर परिषदेच्या परवानगीने वीज वितरण कंपनीच्या वतीने विद्युत तारा यांच्या आड येणाऱ्या अनेक झाडांच्या फांद्या वीज वितरण कंपनीच्या वतीने छाटल्या आहेत व त्या छाटलेल्या फांद्या रस्त्याच्या कडेलाच अनेक दिवसांपासून पडून आहे गेल्या महिन्यापूर्वी छाटलेल्या फांद्या तिथेच पडलेले आहे त्या फांद्या व पाला कुजून वाळून गेला आहे तरीही शिरूर नगरपरिषद किंवा वीज वितरण कंपनीला याबाबत कुठलेही देणे घेणे नाही. जर प्रशासनाच्या लोकांनी केलेली घाण तुम्हाला काढता येत नाही व जे नागरिक कररूपी पैसा भरतात स्वच्छतेचा कर देतात त्यांना ५० हजाराचा दंड का? असा सवालही शहरातून येत आहे. न्याय सर्वांना समान हवाय.
शिरूर शहरातील सेंटर दवाखाना येथे दोन ठिकाणी माणिकचंद हॉस्पिटल जवळ पिडीसीसी बँकेसमोर, एचडीएफसी बँकेसमोर, मुळे डॉक्टरांच्या समोर, जिजामाता गार्डन ते सेंटर शाळा जवळ अशाप्रकारे झाडाच्या फांद्या पडल्या आहेत या फांद्या उचलण्यासाठी कोणवाली नगरपरिषद का ?वीज वितरण कंपनी याबाबत घोळ निर्माण झाला आहे.
या फांद्या तोडणारी वीज वितरण कंपनी असून या कंपनीला नगरपरिषदेने सहा सप्टेंबर रोजी दिलेल्या ५० हजाराच्या दंडाच्या जाहिरातीनुसार दंड करणार का? असा सवालही सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.
अहो मुख्याधिकारी साहेब तुमचे तर खरे आहे स्वच्छ शिरूर सुंदर शिरूर परंतु तुमच्या नगरपरिषदेच्या आणि वीज वितरण च्या या दोन्ही प्रशासनाच्या वतीने शहरात दहा ठिकाणी महिन्यापासून कचरा साचला आहे हा उचलणार कोण... नागरिक.... मग तुमचे स्वच्छ शिरूर सुंदर शिरूर आता अस्वच्छ शिरूर अस्वच्छ शिरूर असेच म्हणावे लागेल....