शिरूर
( प्रतिनिधी ) कारेगाव ता. शिरूर येथील एस ईन चौक परिसरातील गोवा वाईन समोर एक इसम बेकायादेशीपणे देशी विदेशी दारुच्या बाटल्यांची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यांनतर रांजणगाव एमआयडीसि पोलिसांच्या पथकाने सदर ठिकाणी जाऊन छापा टाका असता त्यांना एक इसम दारुची विक्री करताना मिळून आला, दरम्यान पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्या जवळील दारु साठा जप्त केला, तर याबाबत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय रमेश शिंदे रा. रांजणगाव गणपती ता. शिरुर जि. पुणे यांनी रांजणगाव एमआयडीसि पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी आकाश श्रीनिवास नारवा वय २६ वर्षे रा. अमर दिप सोसायटी कारेगाव ता. शिरुर जि. पुणे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अभिमान कोळेकर हे करत आहे.