टाकळी हाजीत पेट्रोल पंपाचे ८२हजार रूपये घेऊन कामगार फरार

9 Star News
0
टाकळी हाजीत पेट्रोल पंपाचे ८२हजार रूपये घेऊन कामगार फरार
शिरूर 
( प्रतिनिधी ) टाकळी हाजी ता. शिरुर येथील व्यंकटेशा पेट्रोल पंपावर काम करणारा कामगार पेट्रोल पंप मधील ८२ हजार रुपयांची रक्कम स्वतःच्या बँक खात्यामध्ये टाकून फरार झाल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे महादेव शिवाजी कोकाटे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
                      टाकळी हाजी ता. शिरुर येथे प्रभाकर गावडे यांच्या मालकीचे व्यंकटेशा पेट्रोल पंप असून येथे कामगार असलेल्या महादेव कोकाटे याने ग्राहकांकडून ऑनलाइन पद्धतीने आलेले पैसे त्याच्या स्वतःच्या बँक खात्यामध्ये घेतले, त्यांनतर गोळा झालेली रोख रक्कम मालकाकडे जमा केली मात्र ऑनलाईन पद्धतीने घेतेलेले तब्बल ब्याऐंशी हजार रुपये रक्कम त्याच्या जवळ ठेवून घेत मालकाची फसवणूक करुन फरार झाला, याबाबत प्रभाकर बापूराव गावडे वय ६५ वर्षे रा. टाकळी हाजी ता. शिरुर जि. पुणे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी ,महादेव शिवाजी कोकाटे रा. गायकवाड वस्ती जळगाव ता. शेवगाव जि. अहमदनगर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार उमेश भगत हे करत आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!