उपसभापतींना शिव्या देऊ नको म्हटल्याने एकाला मारहाणकेंदूरमध्ये झालेल्या मारहाणीत इसमाच्या हाताला गंभीर दुखापत

9 Star News
0
उपसभापतींना शिव्या देऊ नको म्हटल्याने एकाला मारहाण
केंदूरमध्ये झालेल्या मारहाणीत इसमाच्या हाताला गंभीर दुखापत
शिरूर 
( प्रतिनिधी ) केंदूर ता. शिरुर येथे सरपंचांसह काही इसम शाळेच्या कामानीबाबत चर्चा करत असताना येथे आलेले राजू ताठे यांनी उपसभापती व त्यांच्या पतीचे नाव घेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली असता त्यांना शिव्या देऊ नका असे म्हटल्याच्या करणातून एका इसमाला लोखंडी गजाने बेदम मारहाण करत हाताला गंभीर दुखापत केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे राजू हिरालाल ताठे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
                    केंदूर ता. शिरुर येथे सरपंच अमोल थिटे, काळूराम पऱ्हाड व गणेश पऱ्हाड हे शाळेच्या कामानीच्या कामाबाबत चर्चा करत असताना राजू ताठे त्यांच्या कार मधून तेथे आले आणि तुम्हीं या कामाबाबत सरपंचांना कशाला सांगता उपसभापती सविता पऱ्हाड व ग्रामपंचायत सदस्य प्रमोद पऱ्हाड यांना सांगा असे म्हणून उपसभापती व त्यांच्या पतीच्या नावे शिवीगाळ करु लागले, यावेळी गणेश पऱ्हाड यांनी तुम्ही उपसभापती आणि ग्रामपंचायत सदस्यांना शिवीगाळ करु नका असे म्हटले असता राजू यांनी त्यांच्या कारमधून लोखंडी गज काढून गणेश यांना शिवीगाळ, दमदाटी करत लोखंडी गजाने तसेच हाताने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली, सदर मारहाणीमध्ये गणेश पऱ्हाड यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून याबाबत गणेश विलास पऱ्हाड वय ३४ वर्षे रा. केंदूर पऱ्हाडवाडी ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी राजू हिरालाल ताठे रा. केंदूर पऱ्हाडवाडी ता. शिरुर जि. पुणे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राकेश मळेकर हे करत आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!