सुरक्षारक्षकाने मोबाईल चोरुन लांबवले पंचेचाळीस हजार
( प्रतिनिधी ) रांजणगाव गणपती ता. शिरुर येथील बाजल लिमिटेड कंपनीत कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने एका इसमाचा मोबाईल चोरून त्यातील फोन पे द्वारे तब्बल पंचेचाळीस हजार रुपये लांबवल्याची घटना घडली असल्याने रांजणगाव एमआयडीसि पोलीस स्टेशन येथे सुरक्षारक्षक अंकुश इंगळे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रांजणगाव गणपती ता. शिरुर येथील बाजल लिमिटेड कंपनीत कंपनीत कामाला असलेला सुरक्षा रक्षक अंकुश इंगळे याने मोहम्मद हुसेन याचा मोबाईल चोरून नेला, त्यांनतर दोन दिवसांनी हुसेन याच्या फोन पे मधून वेळोवेळी पंचेचाळीस हजार रुपये ट्रान्सफर केले असल्याचे समोर आले, याबाबत मोहम्मद आदाब हुसेन वय २८ वर्षे रांजणगाव गणपती ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. बमैहला ता. लेहरपूर जि. सितापूर उत्तरप्रदेश यांनी रांजणगाव एमआयडीसि पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी सुरक्षारक्षक अंकुश इंगळे ( पूर्ण नाव पत्ता माहित नाही ) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार तेजस रासकर हे करत आहे.