कासारीत मित्रानेच घातला मित्राला दहा लाखांना गंडाकंपनीत बिजनेसच्या नावाखाली केली दहा लाखांची फसवणूक

9 Star News
0
कासारीत मित्रानेच घातला मित्राला दहा लाखांना गंडा
कंपनीत बिजनेसच्या नावाखाली केली दहा लाखांची फसवणूक
शिरूर 
( प्रतिनिधी ) कासारी ता. शिरुर येथील एका भामट्याने आपल्या मित्राला कंपनीमध्ये बिजनेस करुन देतो असे म्हणून तब्बल दहा लाख एक्कावन हजारांची फसवणूक केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे निलेश तुकाराम नेवसे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
                        कासारी ता. शिरुर येथील निलेश नेवसे हा युवक चाकण येथील एका कंपनीत कामाला असल्याने त्याने गावातील महेश भुजबळ या मित्राला विश्वासात घेत त्याला मी काम करत असलेल्या कंपनीमध्ये वेगवेगळे साहित्य तू पूरव तुला पैसे भेटतील असे सांगून निलेश याने महेशला विश्वासात घेऊन मी सर्व काही करतो असे सांगून कंपनीच्या एका फॉर्मवर सह्या घेतल्या, त्यांनतर कंपनीच्या मेळ आयडी वरून महेशला वेगवेगळ्या वस्तूंची पर्चेस यादी पाठवून त्यासाठी लागणारे पैसे मागवून घेतले, चार महिन्यात दहा लाख एक्कावन हजार रुपये वेगवेगळ्या मटेरियल साठी पाठवून देखील चार महिने गेले तरी महेशला कंपनीकडून काही रक्कम मिळाली नसल्याने त्याने निलेशकडे विचारपूस केली असता मिळतील असा विश्वास त्याने दिला, दरम्यान महेश भुजबळ यांनी कंपनीमध्ये जाऊन चौकशी केली असता कंपनीनेच निलेश नेवसे याच्यावर फसवणूक बाबत पोलिसांत तक्रार केल्याचे समोर आले, त्यावेळी महेश यांनी कंपनीच्या मेलवरून आलेल्या पर्चेस ऑर्डरबाबत चौकशी केली असता निलेश याने बनावट ऑर्डर पाठवलेली असून कंपनीकडे यांच्याकडील काहीही साहित्य आले नसल्याचे निदर्शनास आल्याने, आपल्याच मित्राने आपली लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आल्याने, महेश राजेंद्र भुजबळ वय ३३ वर्षे रा. कासारी ता. शिरुर जि. पुणे यांनी याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी निलेश तुकाराम नेवसे रा. कासारी ता. शिरुर जि. पुणे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक रोहिणी सोनावले करत आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!