शिरूर प्रतिनीधी
शिरूर तालुक्यातील जांबुत कळमजाई मळ्यात लावलेला पिंजऱ्यात आणखी एक बिबट्या आज रात्री जेरबंद झाला असल्याची माहिती शिरूर वन विभागाचे अधिकारी यांनी दिली आहे.
२६ ऑगस्ट रोजी जांबुतेची मुक्ताबाई खाडे या ५६ वर्षे महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात नागरिक महिला यांच्या वतीने वनविभागा विरोधात संताप प्रतिक्रिया दिली होती तर जांबुत या ठिकाणी नागरिकांनी रास्ता रोको आंदोलनही केले होते.
स्थानिक ग्रामस्थांच्या रोषणानंतर वन विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.
या अगोदरही २८ऑगस्ट रोजी या ठिकाणी बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला होता त्यानंतर आता हा दुसरा बिबट्या तीन ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता जेरबंद झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असली तरी या भागात आणखी मोठ्या प्रमाणात बिबट्याची संख्या असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.
या भागात वन विभागाने मोठ्या प्रमाणात पिंजरे लावून या भागात फिरणारी बिबटे जेरबंद व्हावी यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरु केले आहे.
दिनांक 3 सप्टेंबर रोजी कळमजाई मळ्यात लावलेल्या पिंजऱ्यामध्ये सायंकाळी सातच्या दरम्यान तीन ते चार वर्षाचा बिबट्या जेरबंद झालाय याची माहिती शिरूर वन विभागाला मिळाल्यानंतर वन विभागाचे अधिकारी त्याठिकणी जाऊन बिबट्याला ताब्यात घेतले व त्याला माणिक ढोह बिबट्या निवारण केंद्रामध्ये सोडण्यात आले आहे.
